चंद्रकांत खैरे यांचा मतमोजणी केंद्रातून काढता पाय; तेराव्या फेरी अखेरही भुमरे आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 03:32 PM2024-06-04T15:32:20+5:302024-06-04T15:35:22+5:30

Aurangabad Lok Sabha Result 2024: औरंगाबाद मतदारसंघात एकूण ३७ उमेवार रिंगणात आहेत. यापैकी सुमारे ३० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार, असे मानले जात आहे.

Aurangabad Lok Sabha Result 2024: Chandrakant Khaire leaving the counting center; At the end of the thirteenth round, Sandipan Bhumare is in the lead | चंद्रकांत खैरे यांचा मतमोजणी केंद्रातून काढता पाय; तेराव्या फेरी अखेरही भुमरे आघाडीवर

चंद्रकांत खैरे यांचा मतमोजणी केंद्रातून काढता पाय; तेराव्या फेरी अखेरही भुमरे आघाडीवर

Aurangabad Lok Sabha Result 2024: छत्रपती संभाजीनगर : मतमोजणीचा कल लक्षात घेता औरंगाबाद लाेकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी दुपारी १:४० नंतर मतमोजणी केंद्र सोडले. मी थोड्या वेळाने परत येतो, असे म्हणत खैरेंनी परिसर सोडला असला, तरी बहुधा त्यांना कौल लक्षात आला असावा.

पहिल्या फेरीत जलील यांना ३३३८ मतांची आघाडी होती. दुसऱ्या फेरीत जलील यांना २२७२ मतांची आघाडी होती. या फेरीनंतर मात्र भुमरे यांनी आघाडी घ्यायला सुरूवात केली. तिसऱ्या फेरीत भुमरे यांना २२८ मतांची आघाडी होती. चौथ्या फेरीत भुमरे सहा हजार एकवीस मतांनी पुढे गेले. पाचव्या फेरीत १९४९ मतांनी तर सहाव्या फेरीत ७३२० मतांची आघाडी त्यांनी घेतली. सातव्या फेरीअखेरीस दहा हजार एकशे बारा, आठव्या फेरीअंती १६ हजार ७४३ तर नवव्या फेरीच्या मतमोजणीअंती २२ हजार ७९४ मतदान भुमरे यांनी घेतले. तेथून त्यांची आघाडी कायम राहिली. आता तेराव्या फेरी अखेर भूमरे ४२ हजार २२५ मतांनी आघाडीवर आहेत.

सकाळी टपाल मतपत्रिकेची मतमोजणी सुरू केल्यानंतर ईव्हीएममधील मतांचीही मोजणी सुरू करण्यात आली. टपाली मतमोजणी दिवसभर सुरू होती. ईव्हीएम मशीनच्या २७ फेऱ्यांची मोजणी पूर्ण झाल्यानंंतर टपाली मते जाहीर करण्यात येणार आहेत. टपाली मते कोणाला जास्त मिळतील? याबाबत उत्सुकता कायम आहे.

सुमारे ३० उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक मते
अकराव्या फेरीनंतर नोटाला सुमारे २३८५ मते होती. जी सुमारे ३० पेक्षा अधिक उमेदवारांपेक्षा अधिक होती. औरंगाबाद मतदारसंघात एकूण ३७ उमेवार रिंगणात आहेत. यापैकी सुमारे ३० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार, असे मानले जात आहे.

Web Title: Aurangabad Lok Sabha Result 2024: Chandrakant Khaire leaving the counting center; At the end of the thirteenth round, Sandipan Bhumare is in the lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.