"त्यांचे नगरसेवक आमच्या संपर्कात", सुधीर मुनगंटीवारांचे विधान, चंद्रपुरात 'ऑपरेशन लोट्स' सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 19:28 IST2026-01-20T19:26:44+5:302026-01-20T19:28:36+5:30

Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर महापालिकेत त्रिशंकू अवस्था झाली आहे. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यात आहेत, तर भाजपा दुसऱ्या क्रमाकांवर आहे. त्यामुळे उद्धवसेना किंगमेकर बनली आहे. 

"Their corporator is in touch with us", Sudhir Mungantiwar's statement, 'Operation Lots' begins in Chandrapur | "त्यांचे नगरसेवक आमच्या संपर्कात", सुधीर मुनगंटीवारांचे विधान, चंद्रपुरात 'ऑपरेशन लोट्स' सुरू

"त्यांचे नगरसेवक आमच्या संपर्कात", सुधीर मुनगंटीवारांचे विधान, चंद्रपुरात 'ऑपरेशन लोट्स' सुरू

Chandrapur Mayor 2026 : चंद्रपूरच्या जनतेने दिलेल्या जनादेशामुळे सत्तेचा पेच फसला आहे. काँग्रेसला बहुमतासाठी चार जागांची गरज आहे, तर भाजपाही बहुमतापासून बरीच लांब आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून सत्तेसाठी लागणाऱ्या बहुमताची जुळवा जुळव सुरू आहे. भाजपाने आता काँग्रेसचेच नगरसेवक फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपा नगरसेवकांच्या संपर्कात असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी मात्र, हे दावे फेटाळत बहुमताची जुळवणी झाल्याचे सांगितले. दुसरीकडे भाजपाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मात्र खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार असे काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून, आम्ही सत्तेसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली. 

उद्धवसेनेकडून चंद्रपूरमध्ये मोठी मागणी करण्यात आली आहे. आमचा महापौर करेल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रपुरात राजकीय घडामोडींना नाट्यमय वळण मिळाले आहे. 

काँग्रेस नगरसेवकांकडून आम्हाला प्रतिसाद -मुनगंटीवार  

भाजपाचे नेते मुनगंटीवार म्हणाले, "काँग्रेसच्या काही नगरसेवकांशी आमचे नगरसेवक बोलत आहेत. विकासासाठी तुम्ही आमच्या बाजूने यावे. आणि काँग्रेस काही नगरसेवक तसा प्रतिसादही देत आहेत. त्यांना याची जाणीव आहे आणि म्हणून भाजपाच्या काही नगरसेवकांना काँग्रेसच्या काही नगरसेवकांशी संपर्क करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे."

विजय वडेट्टीवारांनी दावा फेटाळला: म्हणाले, या अफवा 

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र काँग्रेसचे नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, "सुधीर मुनगंटीवारांनी विधान केले की, काँग्रेसचा एक गट... या सगळ्या अफवा आहेत. ती मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे. नगरसेवक पूर्णपणे सुरक्षित आहेत. सर्व आमच्याकडेच आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारी जी काही संख्या लागते त्याची व्यवस्था झालेली आहे", असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

"काँग्रेसमध्ये धानोरकर आणि वडेट्टीवार गट पडलेत"

"काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. त्या २७ मध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात स्पर्धा लागलेली आहे. आपापल्या गटात नेण्याचे काम त्यांचे सुरू आहे. सत्ता स्थापनेसाठी मार्गदर्शक नेते सुधीर मुनगंटीवार हे प्रयत्न करत आहेत", असे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.  

"आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. काँग्रेसचा इतिहास असा राहिला आहे की, त्यांच्यात फूट पडते. त्यांना सत्ता सांभाळता येत नाही. जनतेच्या मुलभूत सोयी त्यांना देता येत नाही. केवळ सत्तेचे राजकारण करण्यासाठी त्यांचे दोन गट स्थापन झाले आहेत", असे भाजपाचे आमदार किशोर जोरगेवार हे विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा खासदार धानोरकर यांच्याबद्दल बोलताना म्हणाले. 

Web Title : चंद्रपुर: भाजपा का 'ऑपरेशन लोटस' शुरू, कांग्रेस पार्षद संपर्क में।

Web Summary : चंद्रपुर में सत्ता के लिए संघर्ष जारी है। भाजपा ने कथित तौर पर 'ऑपरेशन लोटस' शुरू किया, कांग्रेस पार्षदों से संपर्क किया। कांग्रेस ने दलबदल से इनकार किया, बहुमत का दावा किया। धानोरकर और वडेट्टीवार गुटों के बीच आंतरिक विभाजन से राजनीतिक नाटक बढ़ गया है।

Web Title : Chandrapur: BJP's 'Operation Lotus' begins as Congress corporators contacted.

Web Summary : Chandrapur faces a power struggle. BJP allegedly initiates 'Operation Lotus,' contacting Congress corporators. Congress denies defections, claiming majority. Internal Congress divisions, between Dhanorkar and Wadettiwar factions, are adding to the political drama.