बोटात खड्याच्या अंगठ्या अन् मनगटावर गंडेदोरे; रोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे, इच्छुकांची उमेदवारीसाठी धावाधाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:40 IST2025-12-29T16:51:38+5:302025-12-29T17:40:58+5:30
Chandrapur : युती-आघाडीमधील चर्चेचे गुन्हाळ सुरू असताना अनेक इच्छुकांनी देवदर्शन घेण्यास सुरुवात केली आहे.

Stone rings on fingers and ropes on wrists; different colored clothes every day, aspirants rush to contest for the nomination
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : युती-आघाडीमधील चर्चेचे गुन्हाळ सुरू असताना अनेक इच्छुकांनी देवदर्शन घेण्यास सुरुवात केली आहे. काहींनी ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार नवनवीन खड्याच्या अंगठ्या बोटात चढविल्या आहेत, तर काहींच्या मनगटावर नवे गंडेदोरे गुंडाळले गेले. काहींनी यज्ञयाग, शांती मंत्रतंत्रांचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे.
अनेकांचे बुवा, बाबा, आध्यात्मिक गुरू ठरलेले असून, त्यांच्याकडील येरझाऱ्या वाढल्या आहेत. अगोदर सीट मिळवायची आहे. मग ती जिंकून अजून पुढील पाच वर्षांकरिता राजकारणातील वाट सुकर करायची आहे. काहींना बुवाबाबांनी रोज कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे याचे आदेश दिले असल्याची चर्चा आहे.
इच्छुकांची धावाधाव
बोटांतील जुन्या अंगठ्या जाऊन गुरू, पाचू, पोवळे, नवग्रहाच्या नव्या अंगठ्या चढविल्या आहेत. इच्छुकांनी देव-देवतांचे, महाकालीचे दर्शन घेत आहेत.
वास्तुशास्त्रानुसार रचना
जनसंपर्क कार्यालयात बसण्याच्या खुर्चा, टेबलची मांडणी पूर्व-पश्चिम उत्तर-दक्षिण अशा दिशा पाहून नवीन रचना केलेय. वास्तुशास्त्र, ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार कार्यालयातील रचना, रंगरंगोटी केली आहे.