Maharashtra Election 2019 ; पाच वर्षात शेतकरी हिताची कामे केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:00 AM2019-10-20T06:00:00+5:302019-10-20T06:00:37+5:30

आघाडी सरकारने १५ वर्षांत काय केले, याचा आधी हिशोब द्यावा. आम्ही पाच वर्षात काय केले, ते सांगतो. पाच वर्षात शेतकऱ्यांना धानाला ५०० रुपये बोनस दरवर्षी, मावातुळतुळा निधी, बोंडळीचा निधी, दुष्काळ निधी, पीक कर्ज माफी, जलयुक्त शिवार माध्यमातून शेतकरी सुखी करण्यासाठी झालेली कामे असे अनेक कामे केली.

Maharashtra Election 2019 ; In five years, worked for the benefit of the farmers | Maharashtra Election 2019 ; पाच वर्षात शेतकरी हिताची कामे केली

Maharashtra Election 2019 ; पाच वर्षात शेतकरी हिताची कामे केली

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस । भांगडियांच्या प्रचारार्थ भिसी येथे जाहीर सभा

चिमूर : आघाडी सरकारने १५ वर्षांत काय केले, याचा आधी हिशोब द्यावा. आम्ही पाच वर्षात काय केले, ते सांगतो. पाच वर्षात शेतकऱ्यांना धानाला ५०० रुपये बोनस दरवर्षी, मावातुळतुळा निधी, बोंडळीचा निधी, दुष्काळ निधी, पीक कर्ज माफी, जलयुक्त शिवार माध्यमातून शेतकरी सुखी करण्यासाठी झालेली कामे असे अनेक कामे केली. आतापर्यंत साडेतीन लाख कुटुंबातील नागरिकांना पट्टे देण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
चिमूर तालुक्यातील भिसी येथे आयोजित भाजपचे उमेदवार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. या सभेला उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार मितेश भांगडिया, उमेदवार बंटी भांगडिया, वसंत वारजूकर, डॉ. श्याम हटवादे, जि. प. सदस्य संजय गजपुरे, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख धर्मसिह वर्मा, जितेंद्र मोटघरे, दिगंबर गुरपुडे, माजी सभापती राजू झाडे, डॉ. दीपक यावले, बंडू नाकाडे, प्रकाश वाकडे, प्रा. विजय टिपले, अशोक कामडी, डॉ. देवनाथ गंधरे, बंडू जावळेकर, पंचायत समिती सदस्य पुंडलिक मत्ते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील मोजक्याच आमदारातील एक असे कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांचे वर्णन करता येईल. ते कधी स्वत:चे काम घेऊन आले नाही. परंतु चिमूर विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी, निधीसाठी, विकास योजनांसाठी शंभरदा आले आणि सर्वाधिक निधी आणून चिमूर क्षेत्रातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे निर्माण केले. अशा दिवसरात्र काम करणाºया बंटी भांगडिया यांना पुन्हा एकदा आमदार बनवा, पुन्हा नवीन विकास दिसेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Web Title: Maharashtra Election 2019 ; In five years, worked for the benefit of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chimur-acचिमूर