सिंचन घोटाळा उघडकीस; अधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 13:58 IST2024-10-09T13:57:20+5:302024-10-09T13:58:18+5:30
राजपत्रित अधिकारी महासंघ आता मैदानात : राज्यभरात संतापाची लाट

Irrigation Scam Exposed; Death threats to officials
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता नीलिमा मंडपे, लेखा अधिकारी संदीप जेऊरकर यांनी मृद व जलसंधारण विभागातील कंत्राटदारांनी केलेले निकृष्ट कामे व भ्रष्टाचार समोर आणला आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांना आता जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने अधिकाऱ्यांमध्ये असुरिक्षततेची भावना निर्माण झाल्याचे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने म्हटले आहे. महासंघाने या घटनेचा निषेध नोंदवित संबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे. अशा घटना राज्यासाठी संतापजक असल्याने अधिकाऱ्यांना धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई असेही निवेदनात म्हटले आहे.
सुरक्षा पुरवा
भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या या अधिकाऱ्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी, यासंदर्भात स्थानिक प्रशासनाला निर्देश द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या
राज्य शासनाला देण्यात आलेल्या निवेदनामध्ये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, दुर्गा महिला मंचच्या अध्यक्ष सिद्धी संपकाळ, कोषाध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस समीर भाटकर यांच्या स्वाक्षरीचे निवेदन राज्य शासनाला पाठविले.
महासंघाने व्यक्त केली चिंता
राज्य शासनाचे ध्येयधोरणे व विकासाची कामे तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम प्रभावीपणे करण्याची जबाबदारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आहे. ग्रामीण व दुर्गम भागात कार्यरत विशेषतः कुटुंबापासून दूर राहून आपले कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धम- कावण्याच्या सातत्याने होत असलेल्याने कर्मचाऱ्यांचेमध्ये संतापाचे वातावरण आहे