चंद्रपुरात सलग पाचव्यांदा होणार महिला महापौर; 'या' नगरसेविकांची नावे आघाडीवर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 18:47 IST2026-01-23T18:41:26+5:302026-01-23T18:47:44+5:30

Chandrapur : चंद्रपूरचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सलग पाचव्यांदा शहराच्या प्रथम नागरिक म्हणून महापौरपद भूषविण्याची संधी मिळाली आहे.

Chandrapur will have a female mayor for the fifth consecutive time; The names of 'these' four corporators are in the lead! | चंद्रपुरात सलग पाचव्यांदा होणार महिला महापौर; 'या' नगरसेविकांची नावे आघाडीवर !

Chandrapur will have a female mayor for the fifth consecutive time; The names of 'these' four corporators are in the lead!

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
चंद्रपूरचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सलग पाचव्यांदा शहराच्या प्रथम नागरिक म्हणून महापौरपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. महापालिकेत मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसमधील तीन नावे आघाडीवर आहेत. भाजपनेही बहुमतासाठी पडद्याआडून वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. या पक्षातूनही महापौर पदासाठी चार नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत.

काँग्रेसच्या उमेदवार व पहिल्या माजी महापौर संगीता अमृतकर यांनी महाकाली वॉर्डातून पुन्हा विजय मिळवला आहे. भाजपच्या उमेदवार व दोन टर्म महापौरपद भूषविणाऱ्या राखी कंचर्लावार आणि याच पक्षाच्या उमेदवार व तिसऱ्या माजी महापौर अंजली घोटेकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला. चंद्रपूरचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले. त्यामुळे सलग पाचव्यांदा चंद्रपूरला महिला महापौर पदावर विराजमान होणार आहे. या निवडणुकीत नऊ उमेदवार ओबीसी महिला प्रवर्गातील राखीव गटातून विजयी झाल्या आहेत. २०१४ मध्ये तेव्हा काँग्रेसच्या नगरसेविका राखी कंचर्लावार यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि महापौरपद मिळवले. 

काँग्रेसकडून महापौर पदाच्या दावेदार

काँग्रेसकडून माजी महापौर संगीता अमृतकर, सुनंदा थोबे, संजीवनी वासेकर ही तीन नावे महापौर पदासाठी चर्चेत आहेत. काँग्रसकडून ओबीसी प्रवर्गातील चंदा वैरागडे यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक जिंकली. याशिवाय काँग्रेसच्या वनश्री मेश्राम, वैशाली महाडोळे, संगीता भोयर यांनीही सर्वसाधारण प्रवर्गातून विजय मिळवला आहे. काँग्रेस बहुमताचा जादूई आकडा गाठून यापैकी कुणाला महापौराचा मुकूट बहाल करते, याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.

भाजपकडूनही चार नगरसेविका चर्चेत

भाजपला केवळ २३ जागा मिळाल्या. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपनेही ताकद पणाला लावली आहे. भाजपकडे आशा देशमुख, सुनीता जयस्वाल, संगीता खांडेकर व अॅड. सारिका संदूरकर या चार नगरसेविकांची नावे महापौर पदासाठी चर्चेत आहेत.

पून्हा महिला शक्ती

तिसऱ्यांदा महापौरपद पुन्हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव निघाले होते. तेव्हा भाजपच्या अंजली घोटेकर यांची महापौरपदी वर्णी लागली. अडीच वर्षानंतर पुन्हा महापौर पदाची सोडत निघाली तेव्हा महिला खुल्या प्रवर्गासाठी पुन्हा महापौरपद राखीव निघाले. यावेळी राखी कंचर्लावार दुसऱ्यांदा महापौर झाल्या.

उद्धवसेनेकडे सर्वांच्या नजरा

उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिन्हे यांच्या पत्नी मनस्वी गिन्हे यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडे महापालिकेत बहुमत नाही. संख्याबळाचे गणित जुळवताना उद्धवसेनेच्या लागल्या आहेत. महापालिका २०१२ मध्ये स्थापन झाली. पहिले महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव निघाले होते. तेव्हा काँग्रेसच्या संगीता अमृतकर पहिल्या महापौर झाल्या होत्या. त्यानंतर महापौर पदाचे आरक्षण महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव होते.

खुल्या गटातून विजयी ओबीसी नगरसेविका

खुल्या गटातून ओबीसी प्रवर्गातील नऊ महिला उमेदवारांनी विजय मिळवला. त्यामध्ये उद्धवसेना ३, काँग्रेस ३, भाजप १ व भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या एका नगरसेविकेचा समावेश आहे. समिकरण बदलल्यास यातील नवे नावही पूढे येऊ शकते.
 

Web Title : चंद्रपुर में लगातार पांचवीं बार महिला महापौर; प्रमुख दावेदारों के नाम!

Web Summary : चंद्रपुर में लगातार पांचवीं बार महिला महापौर होंगी। ओबीसी महिलाओं के लिए पद आरक्षित होने से कांग्रेस और भाजपा सत्ता के लिए प्रतिस्पर्धा कर रही हैं। कांग्रेस से संगीता अमृतकर और भाजपा से आशा देशमुख प्रमुख दावेदार हैं। समर्थन के लिए सबकी निगाहें उद्धव सेना पर टिकी हैं।

Web Title : Chandrapur to have woman mayor for 5th time; frontrunners named.

Web Summary : Chandrapur will have a female mayor for the fifth consecutive time. With the post reserved for OBC women, Congress and BJP vie for power. Sangeeta Amritkar from Congress and Asha Deshmukh from BJP are leading contenders. All eyes are on Uddhav Sena for support.