Lokmat Money >शेअर बाजार > 30348% बम्पर परतावा, ₹13.50 वरून ₹4070 वर पोहोला शेअर, 1 लाखाचे झाले ₹3.01 कोटी

30348% बम्पर परतावा, ₹13.50 वरून ₹4070 वर पोहोला शेअर, 1 लाखाचे झाले ₹3.01 कोटी

...या कालावधीत, शेअरची किंमत प्रति शेअर ₹13.50 वरून ₹4070.00 वर पोहोचली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 12:58 PM2023-08-13T12:58:15+5:302023-08-13T12:58:44+5:30

...या कालावधीत, शेअरची किंमत प्रति शेअर ₹13.50 वरून ₹4070.00 वर पोहोचली आहे.

supreme industries share delivered 30348% bumper return share on rs4070 from rs13.50 | 30348% बम्पर परतावा, ₹13.50 वरून ₹4070 वर पोहोला शेअर, 1 लाखाचे झाले ₹3.01 कोटी

30348% बम्पर परतावा, ₹13.50 वरून ₹4070 वर पोहोला शेअर, 1 लाखाचे झाले ₹3.01 कोटी

अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफे अनेकवेळा म्हणता, "जर एखादा स्टॉक 10 वर्षांपर्यंत ठेवण्याची आपली इच्छा नसेल, तर 10 मिनिटे ठेवण्याचाही विचार करू नका." अर्थात, शेअरमध्ये लाँगटर्म गुंतवणूक करायला हवी, तेव्हाच चांगला फायदा होतो. याच पद्धतीने, भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ काळात मल्टीबॅगर परतावा दिला आहे. अशाच एका कंपनीचे नाव म्हणजे, सुप्रीम इंडस्ट्रीज (Supreme Industries). या कंपनीचा शेअर सध्या 4,070 रुपयांवर पोहोचला आहे.

शेअर प्राइस हिस्ट्री -
गेल्या वीस वर्षांत कंपनीच्या शेअरच्या किमतीत तब्बल ३०३४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत, शेअरची किंमत प्रति शेअर ₹13.50 वरून ₹4070.00 वर पोहोचली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वीस वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये ₹1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आज त्याचे ₹3.01 कोटी झाले असते. 

या शेअरने पाच आणि एका वर्षाच्या कालावधीतही मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या शेअरची किंमत ₹1191.80 प्रति शेअर वरून सध्याच्या पातळीवर पोहोचली आहे. या काळात 241.50 टक्के एवढा परतावा मिळाला आहे.

कंपनीसंदर्भात -
Supreme Industries ही भारतातील एक मुख्य प्लास्टिक प्रोडक्शन कंपनी आहे. देशभरात हिच्या 25 मॅन्यूफॅक्चरिंग सुविधा आहेत. ही कंपनी विविध उत्पादनांच्या कॅटेगिरीमध्ये काम करते. जसे, प्लास्टिक पाईपिंग सिस्टम, क्रॉस-लॅमिनेटेड फिल्म आणि उत्पादने, संरक्षक पॅकेजिंग उत्पादने, औद्योगिक मोल्डेड घटक, मोल्डेड फर्निचर आणि मिश्रित LPG सिलिंडर.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: supreme industries share delivered 30348% bumper return share on rs4070 from rs13.50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.