lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > कमाईची मोठी संधी! 1000-2000 नाही, तर येणार 70000 कोटींचे IPO; पाहा डिटेल्स...

कमाईची मोठी संधी! 1000-2000 नाही, तर येणार 70000 कोटींचे IPO; पाहा डिटेल्स...

टाटा, रिलायन्स, ओलासह अनेक कंपन्या IPO आणण्याच्या तयारीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 07:42 PM2024-03-29T19:42:30+5:302024-03-29T19:43:07+5:30

टाटा, रिलायन्स, ओलासह अनेक कंपन्या IPO आणण्याच्या तयारीत.

Share Market IPO: Not 1000-2000, but 70000 crore IPOs; See details... | कमाईची मोठी संधी! 1000-2000 नाही, तर येणार 70000 कोटींचे IPO; पाहा डिटेल्स...

कमाईची मोठी संधी! 1000-2000 नाही, तर येणार 70000 कोटींचे IPO; पाहा डिटेल्स...

Share Market IPO: शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. पुढील आर्थिक वर्षात तुम्हाला कमाईच्या मोठ्या संधी मिळणार आहेत. याचे कारण म्हणजे, पुढील आर्थिक वर्षात 1000 किंवा 2000 नाही, तर तब्बल 70000 कोटी रुपयांहून अधिकचे IPO येणार आहेत. विशेष म्हणजे, 2023-24 पेक्षाही हा आकडा मोठा आहे. आपण 2023-24 च्या आकडेवारीवर नजर टाकली, तर या काळात कंपन्यांनी आपले स्टेक विकून बाजारातून 62,000 कोटी रुपये उभे केले. यामध्ये टाटा ग्रुपपासून ते रिलायन्स ग्रुपपर्यंत, अनेक कंपन्यांचा समावेश आहे. आता या वर्षीही अनेक मोठ्या कंपन्या IPO आणत आहेत.

किती कंपन्यांचे IPO येणार
पुढील वर्षी येणाऱ्या IPO ची एकूण यादी पाहिली, तर सुमारे 19 कंपन्यांच्या IPO चे एकूण मूल्य 25,000 कोटी रुपये आहे. त्यांना सेबीकडून परवानगीदेखील मिळाली आहे. याशिवाय, 37 कंपन्यांनी 45,000 कोटी रुपयांचे IPO येणार असून, त्यांनी कागदपत्रे सेबीकडे सादर केली आहेत. या 56 कंपन्यांपैकी 9 नवीन कंपन्या आहेत. त्यांचा IPO एकूण 21,000 कोटी रुपये आहे.

टाटा समूहाचे 8 IPO येऊ शकतात
पुढील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये टाटा समूहाचे 8 IPO येण्याची शक्यता आहे. यामध्ये टाटा कॅपिटल ते बिगबास्केटचा समावेश आहे. टाटा समूहाने आपल्या अनेक कंपन्यांचे मूल्य अनलॉक करण्याची योजना आखली आहे. गेल्या वर्षीच टाटा समूहाने टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ आणला होता. टाटा मोटर्सचे दोन स्वतंत्र युनिट्समध्ये विभाजन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

याशिवाय, आगामी IPO च्या यादीमध्ये Bharti Hexacom, Go Digit Insurance, Ola Electric, Tata Electric, Vaari Energies आणि Swiggy च्या IPO चा देखील समावेश आहे.

(टीप-शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखणीची आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

 

Web Title: Share Market IPO: Not 1000-2000, but 70000 crore IPOs; See details...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.