lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > चांदीच्या दरात दीड हजार रुपयांनी घट, सोनेही अडीचशे रुपयांनी उतरले 

चांदीच्या दरात दीड हजार रुपयांनी घट, सोनेही अडीचशे रुपयांनी उतरले 

Gold-Silver Price : नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सोन्या-चांदीला मागणी वाढल्याने या दोन्ही धातूंच्या दरात सलग तीन दिवस वाढ झाली होती. मात्र सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही धातूंच्या दरात घसरण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 02:20 AM2020-10-27T02:20:44+5:302020-10-27T02:21:44+5:30

Gold-Silver Price : नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सोन्या-चांदीला मागणी वाढल्याने या दोन्ही धातूंच्या दरात सलग तीन दिवस वाढ झाली होती. मात्र सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही धातूंच्या दरात घसरण झाली.

Silver declined by Rs 1,500 and gold by Rs 250 | चांदीच्या दरात दीड हजार रुपयांनी घट, सोनेही अडीचशे रुपयांनी उतरले 

चांदीच्या दरात दीड हजार रुपयांनी घट, सोनेही अडीचशे रुपयांनी उतरले 

जळगाव : गेल्या आठवड्यात नवरात्र उत्सव व विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्याने दरवाढ झालेल्या सोन्या-चांदीच्या दरात सोमवारी घसरण झाली. चांदीचे दर दीड हजार रुपयांनी घसरून ६३ हजार रुपये प्रतिकिलोवर आले, तर सोने अडीशे रुपयांनी कमी होऊन ५१ हजार ४०० रुपयांवर स्थिर झाले. 
नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सोन्या-चांदीला मागणी वाढल्याने या दोन्ही धातूंच्या दरात सलग तीन दिवस वाढ झाली होती. मात्र सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही धातूंच्या दरात घसरण झाली. विजयादशमी व नवरात्र उत्सवही संपल्याने दर कमी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सोमवारी अमेरिकन डॉलरचे दर काहीसे वधारून ७३.८९ वर पोहोचले, तरीदेखील सोन्या-चांदीचे दर कमी झाले. यात चांदीच्या दरात दीड हजार रुपयांनी घसरण झाली. तर सोन्याचेही दर अडीशे रुपयांनी कमी झाले.

Web Title: Silver declined by Rs 1,500 and gold by Rs 250

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.