Lokmat Money >गुंतवणूक > ...तर ८१ हजार रुपये मिळतील; जुने पीएफ खाते पुन्हा सुरू कसे करावे?

...तर ८१ हजार रुपये मिळतील; जुने पीएफ खाते पुन्हा सुरू कसे करावे?

खासगी कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना विविध कारणांमुळे नोकरी बदलावी लागते. यामध्ये अनेक वेळा चांगली नोकरी नसल्याने, पगार न वाढवल्याने किंवा अधिक चांगल्या करिअरसाठी नोकरी सोडली जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 07:40 AM2022-09-11T07:40:59+5:302022-09-11T07:41:58+5:30

खासगी कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना विविध कारणांमुळे नोकरी बदलावी लागते. यामध्ये अनेक वेळा चांगली नोकरी नसल्याने, पगार न वाढवल्याने किंवा अधिक चांगल्या करिअरसाठी नोकरी सोडली जाते.

Know About How to reopen old PF account? | ...तर ८१ हजार रुपये मिळतील; जुने पीएफ खाते पुन्हा सुरू कसे करावे?

...तर ८१ हजार रुपये मिळतील; जुने पीएफ खाते पुन्हा सुरू कसे करावे?

चंद्रकांत दडस, उपसंपादक

अनेक वेळा माहिती नसल्यामुळे लोक जुन्या पीएफ खात्यातून पैसे काढल्यानंतर नवीन कंपनीत नवीन पीएफ खाते उघडतात. यामुळे दोन यूएन क्रमांक तयार होतात. त्यामुळे भविष्यात पैसे काढताना अडचणी येऊ शकतात. जुने पीएफ खाते पुन्हा सुरू कसे करावे याबाबत जाणून घेऊ...

खासगी कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना विविध कारणांमुळे नोकरी बदलावी लागते. यामध्ये अनेक वेळा चांगली नोकरी नसल्याने, पगार न वाढवल्याने किंवा अधिक चांगल्या करिअरसाठी नोकरी सोडली जाते. अनेक लोक एका ठिकाणी नोकरी सोडल्यानंतर, ते पीएफ खाते क्रमांक देखील सोडतात आणि दुसऱ्या संस्थेत नवीन खात्यातून पीएफ जमा करण्यास सुरुवात करतात.
एकदा पीएफ खाते उघडल्यानंतर, खाते आणि त्याचा पीएफ क्रमांक म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर सेवानिवृत्तीपर्यंत सारखाच असतो. जर एखाद्याकडे अनेक पीएफ खाते क्रमांक असतील तर त्याला एकत्र करता येते.

या प्रकारे खाती एक करा
ईपीएफओच्या वेबसाइटला भेट देऊन सध्याच्या पीएफ खात्याचा यूएएन नंबर लॉग इन करा. त्यानंतर वन मेंबर वन ईपीएफ खाते क्रमांकावर क्लिक करा. येथे तुमचा जुना पीएफ नंबर नवीन खात्यात ट्रान्स्फर करण्यासाठी अर्ज करा. यानंतर, तुमच्या जुन्या खात्यांची ईपीएफओद्वारे पडताळणी होईल. यानंतर जुने खाते निष्क्रिय केल्यानंतर, ते नवीन यूएएनशी लिंक केले जाईल. त्यांनतर ही माहिती तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे प्राप्त होते.

ई-नॉमिनेशन केले का?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या खातेदारांसाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, ईपीएफओ खातेधारक पीएफ पासबुक पाहू शकणार नाहीत किंवा पैसे काढू शकणार नाहीत. ईपीएफओच्या नवीन नियमांनुसार याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ज्या खातेदारांनी अद्याप ई-नॉमिनेशन केलेले नाही, त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

...तर ८१ हजार रुपये मिळतील
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ६ कोटींहून अधिक खातेदारांच्या खात्यात लवकरच सरकार व्याजाचे पैसे हस्तांतरित करणार आहे. या वर्षी पीएफ खातेधारकांना ८.१ टक्के दराने पीएफवर व्याज मिळेल, जे ४० वर्षांतील सर्वात कमी आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत पीएफच्या व्याजाचे पैसे जमा होतील, असे सांगण्यात आले आहे. जर तुमच्या पीएफ खात्यात १० लाख रुपये असतील, तर तुम्हाला ८१ हजार रुपये व्याज रूपात मिळतील.

बॅलन्स कसा तपासणार?
तुम्ही पीएफ खात्याशी लिंक असलेल्या रजिस्टर नंबरवरून ०११-२२९०१४०६ वर मिस्ड-कॉल किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून ९९६६०४४४२५ नंबरवर कॉल करून बॅलन्सबाबत माहिती घेऊ शकता.

 

Web Title: Know About How to reopen old PF account?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.