lokmat Supervote 2024
Lokmat Money >गुंतवणूक > परदेशी गुंतवणुकदारांची भारताला पहिली पसंती; पंधरा दिवसात 52 हजार कोटींची गुंतवणूक

परदेशी गुंतवणुकदारांची भारताला पहिली पसंती; पंधरा दिवसात 52 हजार कोटींची गुंतवणूक

भारतातील परदेशी गुंतवणुकीमुळे चीन आणि पाकिस्तानला मोठा धक्का.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 05:19 PM2023-12-18T17:19:22+5:302023-12-18T17:20:11+5:30

भारतातील परदेशी गुंतवणुकीमुळे चीन आणि पाकिस्तानला मोठा धक्का.

foreign Investment in India: India is the first choice of foreign investors; 52 thousand crores investment in fifteen days | परदेशी गुंतवणुकदारांची भारताला पहिली पसंती; पंधरा दिवसात 52 हजार कोटींची गुंतवणूक

परदेशी गुंतवणुकदारांची भारताला पहिली पसंती; पंधरा दिवसात 52 हजार कोटींची गुंतवणूक

Investment in India:भारतीय शेअर बाजार सध्या ऑल टाइम हायवर आहे. बाजाराने उच्चांक गाठण्यात परदेशी गुंतवणूकदारांचा मोठा वाटा आहे. गेल्या 15 दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनीभारतात 52 हजार रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. तर 2023 मध्ये परदेशातून 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे. विशेष म्हणजे, अमेरिका आणि युरोपीय देशांचा भारतावरील वाढत्या विश्वासामुळे चीन आणि पाकिस्तानला मिर्ची लागली आहे. 

15 दिवसांत 52 हजार कोटींची गुंतवणूक
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत भारतीय बाजारपेठेत सुमारे 52 हजार कोटी रुपये, म्हणजेच 6.23 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. ज्यामध्ये 42,733 कोटी रुपये थेट इक्विटीमध्ये गुंतवले गेले आहेत, तर लोन मार्केटमध्ये 8,937 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी डेटानुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी (FPIs) डिसेंबरच्या पहिल्या 15 दिवसांत गुंतवलेली रक्कम हा एक विक्रम आहे. आजपर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी कोणत्याही महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत इतकी गुंतवणूक केलेली नाही. 

जूनचा विक्रम मोडणार ?
डिसेंबरच्या उर्वरित 15 दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढेल अन् जून 2023 चा विक्रम मोडेल, असा विश्वास जाणकारांना आहे. जून 2023 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत इक्विटीमध्ये 47,148 कोटी रुपये आणि कर्जामध्ये 9,178 कोटी रुपयांची गुंतवणूक होती. डिसेंबर महिन्यात हा विक्रम मोडीत निघू शकतो. विशेष बाब म्हणजे संपूर्ण वर्षात केवळ 4 महिने असे आहेत, ज्यात विदेशी गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे परत घेतले.

6 वर्षांत प्रथमच 2 लाख कोटींची गुंतवणूक
विशेष बाब म्हणजे 2023 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी देशाच्या बाजारपेठेत 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 6 वर्षांनंतर परदेशी गुंतवणूकदारांनी देशात 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्या 10 वर्षात ही तिसरी वेळ आहे, ज्यात परदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक 2 लाख कोटींच्या पुढे गेली आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असताना विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत एकूण 2.56 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. 

चीन आणि पाकिस्तानमध्ये परकीय गुंतवणूक
आपण चीनबद्दल बोललो तर चीनच्या शेअर बाजारांमध्ये सतत घसरण होत आहे. शांघाय ते हाँगकाँगपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक सातत्याने घसरत आहे. चालू वर्षात शांघाय निर्देशांक सुमारे 6 टक्क्यांनी घसरला आहे. दुसरीकडे, हाँगकाँगचा हँग सेंग 17.45 टक्क्यांनी घसरला आहे. चीनच्या दोन्ही निर्देशांकांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा ओघ सातत्याने कमी होत आहे. परदेशी गुंतवणूकदारही सातत्याने पैसे काढून घेत आहेत, त्यामुळे चिनी बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे, पाकिस्तान कधी चीनसमोर, कधी आखाती देशांसमोर तर कधी IMF आणि जागतिक बँकेसमोर हात पसरुन उभा राहतो. जर आपण पाकिस्तानच्या बाजारपेठेबद्दल बोललो तर हा भारत, चीन, जपान, कोरिया इत्यादी देशांपेक्षा खूपच लहान आहे. तसेच पाकिस्तानचा रुपया डॉलरच्या तुलनेत लक्षणीयरीत्या घसरला आहे. सप्टेंबर तिमाहीत पाकिस्तानमध्ये FPI गुंतवणूक केवळ 9 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 253 कोटी पाकिस्तानी रुपये आहे. 
 

Web Title: foreign Investment in India: India is the first choice of foreign investors; 52 thousand crores investment in fifteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.