lokmat Supervote 2024
Lokmat Money >गुंतवणूक > भारतात SIP केव्हापासून सुरू झाली माहितीये? आता किती लोक करतात गुंतवणूक, जाणून घ्या

भारतात SIP केव्हापासून सुरू झाली माहितीये? आता किती लोक करतात गुंतवणूक, जाणून घ्या

बहुतांश लोकांनी एसआयपी हा शब्द ऐकला असेल. पण भारतात सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅनची सुरूवात (SIP) कधी झाली हे तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 10:03 AM2024-04-13T10:03:54+5:302024-04-13T10:05:43+5:30

बहुतांश लोकांनी एसआयपी हा शब्द ऐकला असेल. पण भारतात सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅनची सुरूवात (SIP) कधी झाली हे तुम्हाला माहीत आहे का?

Do you know when SIP started in India Find out how many people invest now details investment tips | भारतात SIP केव्हापासून सुरू झाली माहितीये? आता किती लोक करतात गुंतवणूक, जाणून घ्या

भारतात SIP केव्हापासून सुरू झाली माहितीये? आता किती लोक करतात गुंतवणूक, जाणून घ्या

हल्ली अनेकजण गुंतवणूकीकडे वळू लागले आहे. बहुतांश लोकांनी एसआयपी हा शब्द ऐकला असेल. पण भारतात सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅनची सुरूवात (SIP) कधी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? असं मानले जातं की १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला एसआयपीची संकल्पना भारतात प्रथम सुरू झाली. मात्र, 'म्युच्युअल फंड सही है' मोहिमेमुळे एसआयपी आणि म्युच्युअल फंड देशात लोकप्रिय झाले आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाच्या (AMFI) डेटानुसार असं दिसून आलंय की एसआयपीद्वारे २०१६ मधील ३,१२२ कोटी रुपयांची गुंतवणूक फेब्रुवारी २०२४ पर्यंत १९,१८७ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.
 

९ वर्षांत SIP खाती वाढली
 

एम्फी डेटानुसार, आज म्युच्युअल फंडांमध्ये सुमारे ८.२० कोटी एसआयपी खाती आहेत, ज्याद्वारे गुंतवणूकदार नियमितपणे गुंतवणूक करतात. मार्च २०१५ अखेर एसआयपी खात्यांची संख्या केवळ ७३ लाख होती. म्हणजे गेल्या ९ वर्षांत एसआयपी खात्यांची संख्या ११ पटीनं वाढली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) ५० ट्रिलियन रुपयांचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आहे.
 

यामुळेच तेजीनं वाढ
 

उद्योग तज्ज्ञांच्या मते, शेअर बाजारातील तेजी आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग यामुळे एसआयपीच्या मार्गानं म्युच्युअल फंड उद्योगात गुंतवणूक वाढण्यास मदत झाली आहे. एम्फीकडे उपलब्ध असलेल्या डेटावरून असं दिसून येतं की एसआयपीद्वारे वार्षिक योगदानामध्येही सातत्यानं वाढ झाली आहे. २०१६-१७ मधील ४३,९२१ कोटी रुपयांवरून, वार्षिक एसआयपी बुक आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये फेब्रुवारीपर्यंत १,७९,९४८ कोटी रुपये झाले आहे.

Web Title: Do you know when SIP started in India Find out how many people invest now details investment tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.