lokmat Supervote 2024
Lokmat Money >गुंतवणूक > सोन्याच्या किंमतीत मोठी तेजी, Gold ETF मध्ये केलेल्या गुंतवणूकीतून मिळू शकतो जास्त फायदा; जाणून घ्या

सोन्याच्या किंमतीत मोठी तेजी, Gold ETF मध्ये केलेल्या गुंतवणूकीतून मिळू शकतो जास्त फायदा; जाणून घ्या

सोन्याची गुंतवणूक ही गुंतवणुकीची पारंपारिक पद्धत आहे. वर्षानुवर्षे, लोक त्यांच्या घरांमध्ये सोनं खरेदी करत आहेत. भविष्यात एक असेट म्हणून त्यांना त्याचा उपयोगही करता येतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 11:14 AM2024-04-08T11:14:49+5:302024-04-08T11:15:03+5:30

सोन्याची गुंतवणूक ही गुंतवणुकीची पारंपारिक पद्धत आहे. वर्षानुवर्षे, लोक त्यांच्या घरांमध्ये सोनं खरेदी करत आहेत. भविष्यात एक असेट म्हणून त्यांना त्याचा उपयोगही करता येतो.

A strong rise in the price of gold investing in Gold ETFs can yield huge gains find out | सोन्याच्या किंमतीत मोठी तेजी, Gold ETF मध्ये केलेल्या गुंतवणूकीतून मिळू शकतो जास्त फायदा; जाणून घ्या

सोन्याच्या किंमतीत मोठी तेजी, Gold ETF मध्ये केलेल्या गुंतवणूकीतून मिळू शकतो जास्त फायदा; जाणून घ्या

सोन्याची गुंतवणूक ही गुंतवणुकीची पारंपारिक पद्धत आहे. वर्षानुवर्षे, लोक त्यांच्या घरांमध्ये सोनं खरेदी करत आहेत. भविष्यात एक असेट म्हणून त्यांना त्याचा उपयोगही करता येतो. अर्थात आजच्या काळात गुंतवणुकीची अनेक नवीन साधने आली असली तरी सोन्यातील गुंतवणूक आजही कमी झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात दररोज वाढ होत आहे. 
 

MCX वर सोन्याचा भाव 70,599 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत यात आणखी वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करणं तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर प्रत्यक्ष सोन्याऐवजी तुम्ही गोल्ड ईटीएफमध्येही गुंतवणूक करू शकता. जाणून घेऊ गोल्ड ईटीएफ म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत.
 

गोल्ड ईटीएफ म्हणजे काय?
 

गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) हा म्युच्युअल फंडाचा गुंतवणूक पर्याय आहे, जो सोन्याच्या वाढत्या आणि घसरलेल्या किमतींवर आधारित आहे. येथे तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता. गोल्ड ईटीएफची शेअर्स प्रमाणे बीएसई आणि एनएसई वर खरेदी आणि विक्री करता येते. मात्र, यामध्ये तुम्हाला सोनं मिळत नाही. जेव्हा तुम्हाला त्यातून बाहेर पडायचं असेल, तेव्हा तुम्हाला सोन्याच्या किमतीएवढे पैसे मिळतील.
 

गुंतवणूक करणं सोपं
 

भौतिक सोन्यापेक्षा यामध्ये गुंतवणूक करणे सोपं आहे कारण ईटीएफ युनिट्समध्ये खरेदी केले जातात. एक गोल्ड ईटीएफ युनिट म्हणजे १ ग्रॅम सोनं. तुमच्याकडे जास्त पैसे नसल्यास, तुम्ही एक किंवा दोन युनिट सोनं खरेदी करू शकता. भौतिक सोनं खरेदी करताना, जर तुम्ही अगदी लहान अंगठी खरेदी केली तर तिचं वजन किमान ४ ते ५ ग्रॅम असेल, अशा परिस्थितीत तुम्हाला मोठ्या रकमेची आवश्यकता असते. गोल्ड ईटीएफ कमी किमतीतही खरेदी करता येते. याशिवाय एसआयपीद्वारे खरेदी करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
 

सुरक्षिततेची काळजी नाही
 

तुम्ही प्रत्यक्ष सोनं खरेदी केल्यास, त्याच्या सुरक्षिततेबद्दल चिंता असते. तर गोल्ड ईटीएफमध्ये अशी कोणतीही समस्या नाही. तुम्ही इलेक्ट्रॉनिक सोनं, ज्या प्रकारे शेअर्स ठेवता, त्याप्रमाणे डिमॅट खात्यात ठेवू शकता. परंतु ते चोरीला जाण्याच्या जोखमीबद्दल तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
 

मेकिंग खर्च वाचतो
 

जेव्हा तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करता तेव्हा तुम्हाला त्याचा मेकिंग चार्ज देखील भरावा लागतो, ज्यामुळे सोन्याची किंमत महाग होते. पण गोल्ड ईटीएफमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मेकिंग चार्ज भरावा लागत नाही. गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यासाठी १ टक्का किंवा त्यापेक्षा कमी ब्रोकरेज आकारले जाते, शिवाय पोर्टफोलिओ मॅनेज  करण्यासाठी वार्षिक १ टक्के चार्ज द्यावा लागतो. पण हे मेकिंग चार्जपेक्षा खूपच कमी आहे.
 

कशी करू शकता गुंतवणूक?
 

जर तुम्हाला गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला आधी डिमॅट खातं उघडावं लागेल. यामध्ये, तुम्ही एनएसईवर उपलब्ध गोल्ड ईटीएफचे युनिट्स खरेदी करू शकता. तुमच्या डीमॅट खात्याशी जोडलेल्या बँक खात्यातून तितकीच रक्कम कापली जाईल. एक-दोन दिवसांनी तुमच्या खात्यात गोल्ड ईटीएफ जमा केले जातील. हे फक्त ट्रेडिंग खात्याद्वारे विकलं जातं.
 

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: A strong rise in the price of gold investing in Gold ETFs can yield huge gains find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.