lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jio Offer: 'या' तीन रिचार्ज प्लॅन्सवर मिळतोय 20 टक्के Cashback; रिचार्जपूर्वी पाहा आणि घ्या फायदा

Jio Offer: 'या' तीन रिचार्ज प्लॅन्सवर मिळतोय 20 टक्के Cashback; रिचार्जपूर्वी पाहा आणि घ्या फायदा

Jio Recharge Plans 2021: रिलायन्स जिओ ही कंपनी सध्या कॅशबॅक ऑफर अंतर्गत तीन नवे प्रीपेड प्लॅन्स सादर करत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 01:12 PM2021-12-06T13:12:16+5:302021-12-06T13:12:34+5:30

Jio Recharge Plans 2021: रिलायन्स जिओ ही कंपनी सध्या कॅशबॅक ऑफर अंतर्गत तीन नवे प्रीपेड प्लॅन्स सादर करत आहे. 

reliance jio cashback offer with its jio prepaid plans check out how to get 20 percent cashback | Jio Offer: 'या' तीन रिचार्ज प्लॅन्सवर मिळतोय 20 टक्के Cashback; रिचार्जपूर्वी पाहा आणि घ्या फायदा

Jio Offer: 'या' तीन रिचार्ज प्लॅन्सवर मिळतोय 20 टक्के Cashback; रिचार्जपूर्वी पाहा आणि घ्या फायदा

Jio Recharge Plans 2021: रिलायन्स जिओ (Reliance Jio) JioMart कॅशबॅक ऑफरसह ३ नवीन प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. JioMart कॅशबॅक ही नवीन ऑफर नाही, परंतु ती प्रीपेड प्लॅनच्या दरात बदल आहे. कंपनी आपल्या 3 प्रीपेड प्लॅनसह 20 टक्के कॅशबॅक देत आहे. यामध्ये 719 रुपयांचा प्लॅन, 666 रुपयांचा प्लॅन आणि 299 रुपयांचा प्लॅन समाविष्ट आहे. हा कॅशबॅक ग्राहकांना त्यांच्या JioMart खात्यात दिला जाईल. रिलायन्स जिओच्या या तीन प्रीपेड प्लॅन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Reliance Jio 719 प्लॅन: 719 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा देण्यात येतो. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 64 Kbps पर्यंत कमी करण्यात येतो. या प्लानमध्ये एकूण 168GB डेटा देण्यात येत असून या प्लॅनसोबत ग्राहकांना 84 दिवसांची वैधता देण्यात येते. याशिवाय या प्लॅनसोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा, तसंच दररोज 100 एसएमएस आणि JioCinema, JioSecurity, JioTV, JioCloud चं मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येतं. 

Reliance Jio 299 प्लॅन: या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा देण्यात येतो. तसंच या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 56 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनसोबत ग्राहकांना 28 दिवसांची वैधता मिळते. शिवाय दररोज 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ देण्यात येतो. JioCinema, JioSecurity, JioTV, JioCloud चं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं. 

Reliance Jio 666 प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा मिळतो. तसंच एकूण 126 जीबी डेटा देण्यात येतो. शिवाय या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि JioCinema, JioSecurity, JioTV, JioCloud चं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं. 

टॅरिफ वाढण्यापूर्वी 299 रुपयांच्या प्लॅनची किंमत 249 रुपये, 666 रुपयांच्या प्लॅनची किंमत 555 रुपये आणि 719 रुपयांच्या प्लॅनची किंमत 598 रुपये होती.

Web Title: reliance jio cashback offer with its jio prepaid plans check out how to get 20 percent cashback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.