lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Ratan Tata: टाटा भारतीय आकाशावर वर्चस्वाच्या तयारीत; एअर इंडिया मिळाली तर काय होणार...

Ratan Tata: टाटा भारतीय आकाशावर वर्चस्वाच्या तयारीत; एअर इंडिया मिळाली तर काय होणार...

Ratan Tata want Air India Deal: सिंगापुर इंटरनॅशनल एअरलाइंस (SIA) सोबत टाटा ग्रुपने विस्तारा नावाने संयुक्त उपक्रम सुरु केला आहे. सिंगापूर एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने यावर काही बोलण्यास नकार दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 01:08 PM2021-09-27T13:08:41+5:302021-09-27T13:09:45+5:30

Ratan Tata want Air India Deal: सिंगापुर इंटरनॅशनल एअरलाइंस (SIA) सोबत टाटा ग्रुपने विस्तारा नावाने संयुक्त उपक्रम सुरु केला आहे. सिंगापूर एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने यावर काही बोलण्यास नकार दिला.

Ratan Tata: Tata ready to dominate Indian skies; What will happen if we get Air India ... | Ratan Tata: टाटा भारतीय आकाशावर वर्चस्वाच्या तयारीत; एअर इंडिया मिळाली तर काय होणार...

Ratan Tata: टाटा भारतीय आकाशावर वर्चस्वाच्या तयारीत; एअर इंडिया मिळाली तर काय होणार...

भारताचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी एअर इंडिया खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे. ही जर बोली यशस्वी ठरली तर टाटा सन्स आपली लो कॉस्ट एअरलाईन्स एअर एशिया ही कंपनी एअर इंडियाच्या छताखाली आणण्याची शक्यता आहे. भारतीय हवाई क्षेत्रात वर्चस्व मिळविण्यासाठी टाटांनी प्रयत्न सुरु केले आहेत. टाटा कंपनीने एकदा एअरलाईन्स चालविण्याचा प्रयत्न केला होता, परंतू तो असफल ठरला होता. (Ratan Tata trying to purchase Air India; if deal success then what next.)

या व्यवहाराशी संबंधीत टॉप एक्झीक्युटीव्हने ही माहिती दिली आहे. काही काळानंतर फुल सर्व्हिस कॅरिअर विस्तारा देखील एअर इंडियाच्या छताखाली आणले जाईल. विस्ताना हे टाटा संस आणि सिंगापूर एअरलाईन्सचे जॉईंट व्हेंचर आहे. यामध्ये हिस्सा हा 49 टक्के आहे. 
मलेशिया आणि एअर एशिया बीएचडीकडे एअर एशिया इंडियामध्ये 16 टक्के वाटा आहे. मार्च 2022 नंतर एअर एशियाचा मलेशियन पार्टनर आपली 18 दशलक्ष डॉलरची हिस्सेदारी विकून कंपनीतून बाहेर पडू शकतो. 

सिंगापुर इंटरनॅशनल एअरलाइंस (SIA) सोबत टाटा ग्रुपने विस्तारा नावाने संयुक्त उपक्रम सुरु केला आहे. सिंगापूर एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने यावर काही बोलण्यास नकार दिला. एअर एशिया इंडिया आणि विस्तारानेदेखील यावर बोलण्यास नकार दिला. भारत सरकारच्या एअरलाईन्सला खरेदी करण्यासाठी टाटाने 15 सप्टेंबरला निविदा दाखल केली आहे. या स्पर्धेत स्पाईसजेटचे प्रमोटर अजय सिंहदेखील सहभागी आहेत. 

Web Title: Ratan Tata: Tata ready to dominate Indian skies; What will happen if we get Air India ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.