lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > परदेशस्थ भारतीयांनी देशात पाठविले ५.५ लाख कोटी

परदेशस्थ भारतीयांनी देशात पाठविले ५.५ लाख कोटी

परदेशांत वास्तव्य भारतीय लोक आपल्या देशांत किती पैसे पाठवितात याची माहिती आहे? इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २0१८ साली परदेशांत राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या देशात साडेपाच लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठविली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 02:03 AM2019-11-30T02:03:11+5:302019-11-30T02:03:42+5:30

परदेशांत वास्तव्य भारतीय लोक आपल्या देशांत किती पैसे पाठवितात याची माहिती आहे? इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २0१८ साली परदेशांत राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या देशात साडेपाच लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठविली.

Over 5.5 lakh crores sent by Indians abroad | परदेशस्थ भारतीयांनी देशात पाठविले ५.५ लाख कोटी

परदेशस्थ भारतीयांनी देशात पाठविले ५.५ लाख कोटी

नवी दिल्ली : परदेशांत वास्तव्य भारतीय लोक आपल्या देशांत किती पैसे पाठवितात याची माहिती आहे? इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २0१८ साली परदेशांत राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या देशात साडेपाच लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठविली.
परदेशांत नोकरी वा व्यवसायानिमित्ताने गेलेले लोक आपापल्या देशांत पैसे पाठवित असतात. कुटुंबे, घरे जिथे असतात, तिथे पैसे पाठवणे हे नित्याचे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संस्थेने या माहितीवर एक अहवाल सादर केला आहे. त्यात घरी पैसे पाठविणाऱ्यांत परदेशस्थ भारतीयांचा पहिला क्रमांक लागतो, असे म्हटले आहे. विविध देशांत राहणारे लोक आपापल्या घरच्यांसाठी जी रक्कम पाठवितात, ती २0१८ साली ६८९ अब्ज डॉलर इतकी होती, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी ७८.६ अब्ज डॉलर (साडेपाच लाख कोटींहून काहीशी अधिक) रक्कम भारतीयांनी मायदेशी पाठविली. परदेशांतील भारतीयांची संख्या लक्षात घेता, तिथे राहणाºया प्रत्येक भारतीयाने मायदेशी ३.१५ लाख रुपये पाठवले, असा याचा अर्थ होतो.

ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत

ग्रीन कार्डच्या प्रतीक्षा यादीत २,२७,००० भारतीयांचा समावेश आहे. ग्रीन कार्डच्या प्रतीक्षा यादीत ४ दशलक्ष लोक आहेत. दरवर्षी केवळ २,२६,००० ग्रीन कार्ड जारी केले जातात. चीनचे १,८०,००० नागरिक प्रतीक्षा यादीत आहेत. ग्रीन कार्ड हा अमेरिकेच्या नागरिकत्वाचा अधिकृत दस्तावेज आहे.

Web Title: Over 5.5 lakh crores sent by Indians abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.