Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जगातील सर्वात मोठी तेल पाइपलाइन कशी काम करते, कुठून सुरू होते अन् किती देशांमधून जाते?

जगातील सर्वात मोठी तेल पाइपलाइन कशी काम करते, कुठून सुरू होते अन् किती देशांमधून जाते?

Druzhba Pipeline Facts: हजारो किलोमीटरपर्यंत पसरलेली ही पाइपलाइन दररोज कोट्यवधी बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक करते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 20:37 IST2026-05-16T20:36:53+5:302026-05-16T20:37:45+5:30

Druzhba Pipeline Facts: हजारो किलोमीटरपर्यंत पसरलेली ही पाइपलाइन दररोज कोट्यवधी बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक करते.

Word Longest Oil Pipeline: How does the world's largest oil pipeline work, how many countries does it pass through? | जगातील सर्वात मोठी तेल पाइपलाइन कशी काम करते, कुठून सुरू होते अन् किती देशांमधून जाते?

जगातील सर्वात मोठी तेल पाइपलाइन कशी काम करते, कुठून सुरू होते अन् किती देशांमधून जाते?

Word Longest Crude Oil Pipeline: मोठमोठ्या जहाजांमधून कच्चा तेलाची वाहतूक होते, हे तुम्ही ऐकलेच असेल. मात्र, जगात एक अशी पाइपलाइन आहे, जी विविध देशांना हजारो बॅरल तेलाचा पुरवठा करते. ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही जगातील सर्वात लांब तेल वाहिनी एका अवाढव्य औद्योगिक नेटवर्कसारखे काम करते. 

हजारो किलोमीटरपर्यंत पसरलेली ही पाइपलाइन दुर्गम भाग, पर्वतरांगा आणि अनेक देशांच्या सीमा ओलांडून दररोज कोट्यवधी बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक करते. विसाव्या शतकातील अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या पाइपलाइनकडे पाहिले जाते. जागतिक ऊर्जा पुरवठ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी ही पाइपलाइन नेमकी कोणती आहे आणि तिचा विस्तार कसा आहे, हे जाणून घेऊ...

'द्रुज्बा पाइपलाइन' 

जगातील सर्वात लांब क्रॉस-कंट्री तेल वाहिनी म्हणून रशियाची 'द्रुज्बा पाइपलाइन' ओळखली जाते. या वाहिनीला 'फ्रेंडशिप पाइपलाइन' असेही म्हटले जाते. ही पाइपलाइन रशियातून सुरू होऊन अनेक देशांमधून जात मध्य आणि उत्तर युरोपपर्यंत पोहोचते. युरोपच्या ऊर्जा सुरक्षेचा ती एक मुख्य कणा मानली जाते.

कोणत्या देशांमधून जाते?

द्रुज्बा पाइपलाइन रशियातील अल्मेत्येव्स्क येथून सुरू होते. पुढे ती अनेक देशांना जोडत युरोपच्या मोठ्या भागात तेलाचा पुरवठा करते. यामध्ये प्रामुख्याने खालील देशांचा समावेश होतो:

  1. रशिया 
  2. बेलारूस 
  3. पोलंड 
  4. जर्मनी 
  5. युक्रेन 
  6. हंगेरी 
  7. स्लोव्हाकिया 
  8. चेक प्रजासत्ताक 

 

पाइपलाइन किती लांब आहे?

मुख्य ट्रंक लाईन : सुमारे ४,००० किलोमीटर.

एकूण नेटवर्क (शाखांसह): सुमारे ५,५०० किलोमीटर.

क्षमता: ही पाइपलाइन दररोज लाखो बॅरल कच्चे तेल वाहून नेण्याची क्षमता ठेवते.

द्रुज्बा पाइपलाइनची काही रंजक वैशिष्ट्ये

  • ही पाइपलाइन दररोज सुमारे १.२ ते १.४ दशलक्ष बॅरल तेलाची वाहतूक करू शकते. 
  • आपल्या प्रवासात ही वाहिनी ४५ पेक्षा जास्त मोठ्या नद्या ओलांडते.
  • या पाइपलाइनचे बांधकाम १९६० ते १९६४ दरम्यान सोव्हिएत युनियनच्या काळात करण्यात आले होते.
  • याचा मुख्य उद्देश सोव्हिएत ब्लॉकच्या देशांना स्वस्त आणि विश्वासार्ह ऊर्जा पुरवणे हा होता.

 

जगातील इतर महत्त्वाच्या लांब तेल वाहिन्या

द्रुज्बा पाइपलाइन व्यतिरिक्त जगात इतरही काही मोठ्या पाइपलाईन्स आहेत, ज्या जागतिक अर्थव्यवस्थेला गती देतात:

१. ESPO Pipeline (रशिया ते आशिया) – ४,८५० किमी

२. Keystone Pipeline (कॅनडा ते अमेरिका) – ३,४०० किमी

३. Kazakhstan–China Pipeline – २,२३० किमी

४. Baku–Tbilisi–Ceyhan Pipeline – १,७६८ किमी

ऊर्जा पुरवठ्यातील ऐतिहासिक महत्त्व

द्रुज्बा पाइपलाइन जागतिक ऊर्जा सुरक्षेचा एक मोठा भाग आहे. काळानुरूप आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक बदल झाले, युद्धांमुळे यात अडथळे आले, तरीही आजच्या घडीला युरोपच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी ही पाइपलाइन कच्चे तेल पुरवणारी एक महत्त्वाची 'लाईफलाईन' बनून उभी आहे.

Web Title : द्रुज्बा: दुनिया की सबसे बड़ी तेल पाइपलाइन - कैसे काम करती है?

Web Summary : द्रुज्बा पाइपलाइन, इंजीनियरिंग का चमत्कार, दुनिया की सबसे लंबी कच्चा तेल पाइपलाइन है। रूस से शुरू होकर, यह कई देशों में हजारों किलोमीटर तक फैली हुई है, जो यूरोप को प्रतिदिन लाखों बैरल तेल की आपूर्ति करती है। यह वैश्विक ऊर्जा सुरक्षा में महत्वपूर्ण भूमिका निभाती है।

Web Title : Druzhba: World's Largest Oil Pipeline - How It Works

Web Summary : The Druzhba pipeline, a marvel of engineering, is the world's longest crude oil pipeline. Originating in Russia, it spans thousands of kilometers across multiple countries, supplying millions of barrels of oil daily to Europe. It plays a vital role in global energy security, overcoming political and wartime hurdles.