Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?

अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?

America China Trade: जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीन यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. चीनमधून अमेरिकेत जाणाऱ्या जहाजांची संख्या सातत्यानं कमी होतेय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:11 IST2025-06-02T15:59:01+5:302025-06-02T16:11:53+5:30

America China Trade: जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीन यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. चीनमधून अमेरिकेत जाणाऱ्या जहाजांची संख्या सातत्यानं कमी होतेय.

will trade between the us and china stop The number of ships carrying goods has halved china us trade war | अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?

अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?

America China Trade: जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीन यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. चीनमधून अमेरिकेत जाणाऱ्या जहाजांची संख्या सातत्यानं कमी होतेय. गेल्या १५ दिवसांत हा आकडा फेब्रुवारीनंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. एप्रिलच्या मध्यापासून त्यात ५० टक्क्यांची घसरण झाली. अमेरिकेचे अर्थमंत्र्यांन, चीन रेअर अर्थ सारख्याचा पुरवठा थांबवत असल्याचं म्हटलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही चीननं गेल्या महिन्यात दोन्ही देशांमधील व्यापार कराराचं उल्लंघन केल्याचं म्हटलं होतं. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये सुरू असलेलं शुल्कयुद्ध थांबलं होतं. दुसरीकडे चीननं अमेरिकेवर नवीन आर्थिक आणि व्यापारी संघर्ष भडकावल्याचा आरोप केलाय.

चीन व्यापार वाटाघाटी कराराची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहे, परंतु अमेरिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अमेरिका एकतर्फी नवीन आर्थिक आणि व्यापारी संघर्षांना चिथावणी देत आहे, द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापार संबंधांमध्ये अनिश्चितता आणि अस्थिरता वाढवत आहे. जर अमेरिकेनं चीनच्या हितसंबंधांना धक्का पोहोचवणारं काम सुरूच ठेवलं, तर चीन आपले कायदेशीर हक्क आणि हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी कठोर आणि मोठी पावलं उचलत राहील, असं चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं सोमवारी एका निवेदनात म्हटलं. 

सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, पाहा १० ग्रॅमसाठी किती करावा लागणार खर्च?

घाईगडबडीत करार

चीननं अमेरिकेसोबत केलेल्या कराराचं पूर्णपणे उल्लंघन केल्याचं यापूर्वी ट्रम्प म्हणाले होते. ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी, चीनला अत्यंत वाईट परिस्थितीपासून वाचवण्यासाठी घाईघाईत करार केला. मिस्टर नाइस गाय बनण्याचा हा परिणाम असल्याचंही ते म्हणाले. काही आठवड्यांपूर्वी जिनिव्हा येथे दोन्ही देशांनी एक करार केला होता. याअंतर्गत दोन्ही देशांनी एप्रिलमध्ये एकमेकांवर लादलेलं शुल्क कमी केलं होतं.

ही व्यवस्था ९० दिवसांची होती. पण आता दोन्ही पक्ष एकमेकांवर कराराच्या भावनेच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप करत असल्यानं हा करार तुटण्याच्या मार्गावर आहे. दोन्ही बाजूंमधील चर्चा रखडल्याचं अमेरिकी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. वाटाघाटींच्या प्रगतीसाठी ट्रम्प आणि चीनचे नेते शी जिनपिंग यांचा सहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं. अमेरिकेचा आरोप आहे की, चीननं रेअर अर्थ आणि संबंधित उत्पादनांची निर्यात थांबवली आहे.

Web Title: will trade between the us and china stop The number of ships carrying goods has halved china us trade war