Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुपरफास्ट...! १० सेकंदांत २ जीबीचा चित्रपट डाऊनलाेड, 5G सेवा आली हो 

सुपरफास्ट...! १० सेकंदांत २ जीबीचा चित्रपट डाऊनलाेड, 5G सेवा आली हो 

लिलावात यशस्वी झालेल्या कंपन्या देशात ५ जी सेवा देतील. विद्यमान ४ जी सेवेपेक्षा ती दहा पट अधिक वेगवान असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 07:03 AM2022-06-16T07:03:54+5:302022-06-16T07:04:39+5:30

लिलावात यशस्वी झालेल्या कंपन्या देशात ५ जी सेवा देतील. विद्यमान ४ जी सेवेपेक्षा ती दहा पट अधिक वेगवान असेल.

Superfast 2GB movie downloaded in 10 seconds 5G service available in next year | सुपरफास्ट...! १० सेकंदांत २ जीबीचा चित्रपट डाऊनलाेड, 5G सेवा आली हो 

सुपरफास्ट...! १० सेकंदांत २ जीबीचा चित्रपट डाऊनलाेड, 5G सेवा आली हो 

नवी दिल्ली :

केंद्रीय मंत्रिमंडळाने ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावास मंजुरी दिली असून, दूरसंचार मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार पुढील २० वर्षांसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावात यशस्वी झालेल्या कंपन्या देशात ५ जी सेवा देतील. विद्यमान ४ जी सेवेपेक्षा ती दहा पट अधिक वेगवान असेल.

प्राप्त माहितीनुसार, स्पेक्ट्रम खरेदी करणाऱ्या कंपनीस ६ महिने ते १ वर्षाच्या आत सेवा सुरू करावी लागेल. अनेक दूरसंचार कंपन्यांनी आपली तयारी पूर्ण केली आहे. स्पेक्ट्रम खरेदीनंतर ३ ते ६ महिन्यांत सेवा सुरू करण्याची कंपन्यांची तयारी आहे. ७२०९७.८४ मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमचा लिलाव जुलै २०२२ च्या अखेरपर्यंत होईल. मिड व हाय फ्रिक्वेंसी बँडचा वापर ५ जी सेवेसाठी होणार आहे. 

काय फायदा होईल?
- गतिमान इंटरनेटचा वापर करता येईल. व्हिडिओ गेमिंग क्षेत्रात क्रांतिकारक बदल होतील.
- यूट्यूबवर व्हिडिओ पाहताना बफरिंगचा त्रास संपेल. व्हॉट्सॲप कॉलमध्ये अडथळे येणार नाहीत.
- २ जीबीचा चित्रपट अवघ्या २० सेकंदांत डाऊनलोड. शेतांच्या देखरेखीसाठी ड्रोनचा वापर शक्य.
- मेट्रो आणि चालकरहित गाड्या ऑपरेट करणे सोपे. व्हर्च्युअल रिॲलिटी व कारखान्यात रोबोट वापरणे सोपे होईल.

५ जी इंटरनेट सेवा म्हणजे?
५ जी म्हणजे पाचव्या पिढीतील इंटरनेट सेवा होय. ही वायरलेस ब्रॉडबँड सेवा आहे. तिच्या ३ फ्रिक्वेन्सी पुढीलप्रमाणे आहेत.
लो फ्रिक्वेन्सी बँड : एरिया कव्हरेजसाठी सर्वोत्तम, इंटरनेट स्पीड कमी १०० एमबीपीएस
मीड फ्रिक्वेन्सी बँड : एरिया कव्हरेज कमी. स्पीड मध्यम १.५ जीबीपीएस. सिग्नलसाठी उत्तम
हाय फ्रिक्वेन्सी बँड : एरिया कव्हरेज सर्वांत कमी. इंटरनेट स्पीड सर्वाधिक २० जीबीपीएस. सिग्नलही चांगले.

या १३ शहरांत प्रथम सुरू होणार ५ जी सेवा 
दिल्ली, लखनौ, कोलकाता, हैदराबाद, चंडीगड, गुरुग्राम, अहमदाबाद, जामनगर, गांधीनगर, मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई

Web Title: Superfast 2GB movie downloaded in 10 seconds 5G service available in next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.