Lokmat Money > बिझनेस न्यूज > ट्रेनपेक्षा स्वस्त विमानाचे तिकिट! स्पाइस जेटची शानदार ऑफर; कंपनी म्हणाली, "पहले आओ-पहले पाओ"

ट्रेनपेक्षा स्वस्त विमानाचे तिकिट! स्पाइस जेटची शानदार ऑफर; कंपनी म्हणाली, "पहले आओ-पहले पाओ"

SpiceJet offer : या खास ऑफरमध्ये तुम्ही फक्त 1126 रुपयांमध्ये विमान तिकीट बुक करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 03:01 PM2023-01-24T15:01:53+5:302023-01-24T15:07:27+5:30

SpiceJet offer : या खास ऑफरमध्ये तुम्ही फक्त 1126 रुपयांमध्ये विमान तिकीट बुक करू शकता.

spicejet offer cheapest flight ticket in republic day sale know travel timing and booking dates | ट्रेनपेक्षा स्वस्त विमानाचे तिकिट! स्पाइस जेटची शानदार ऑफर; कंपनी म्हणाली, "पहले आओ-पहले पाओ"

ट्रेनपेक्षा स्वस्त विमानाचे तिकिट! स्पाइस जेटची शानदार ऑफर; कंपनी म्हणाली, "पहले आओ-पहले पाओ"

नवी दिल्ली : जर तुम्हाला ट्रेन किंवा बसने प्रवास करण्याचा कंटाळा आला असेल आणि तुम्हाला विमानाने प्रवास करायचा असेल, तर तुमच्यासाठी कमी खर्चात संधी आहे. तुम्ही विमान प्रवास अगदी ट्रेनच्या तिकिटच्या दरात करू शकता. याबाबत अजिबात आश्चर्य वाटण्याची गरज नाही, कारण हे शक्य आहे. दरम्यान, एअरलाइन कंपनी स्पाइस जेटने प्रजासत्ताक दिनानिमित्त (SpiceJet Republic Day Sale) एक खास ऑफर आणली आहे.

या खास ऑफरमध्ये तुम्ही फक्त 1126 रुपयांमध्ये विमान तिकीट बुक करू शकता. स्पाइस जेटने वर्षातील सर्वात स्वस्त विमान तिकिटांची घोषणा केली आहे.  या ऑफर अंतर्गत बुक केलेल्या तिकिटांवर तुम्ही 24 जानेवारी 2023 ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान विमान प्रवास करू शकता.

स्पाइसजेटने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, आता तुम्ही केवळ 1126 रुपयांमध्ये देशांतर्गत विमान प्रवास करू शकता.  ही ऑफर 24 ते 29 जानेवारी 2023 पर्यंत सुरू राहणार असून या काळात तुम्हाला तिकीट बुक करावे लागेल. दरम्यान, या ऑफर अंतर्गत बुक केलेल्या तिकिटावर तुम्ही 24 जानेवारी 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत प्रवास करू शकता.

एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, हा सेल स्पाइस जेट शहरातील सर्व ऑफिस, विमानतळ ऑफिस, वेबसाइट, मोबाइल अॅप आणि ट्रॅव्हल एजंट्सद्वारे उपलब्ध असणार आहे. याशिवाय, तिकिट 'पहले आओ, पहले पाओ' या तत्त्वावर उपलब्ध असणार आहे. यापूर्वी टाटा समूहाच्या एअर इंडियानेही प्रजासत्ताक दिनानिमित्त सेल आणला होता. मात्र, ही ऑफर 23 जानेवारीला संपली.

एअर इंडियाने प्रजासत्ताक दिनाच्या सेलमध्ये देशांतर्गत विमान प्रवासाच्या तिकिटांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली होती. या सेलमध्ये तुम्ही फक्त 1,705 रुपयांमध्ये विमान तिकीट बुक करू शकता. दरम्यान, दरवर्षी एअरलाइन कंपन्या खास प्रसंगी अशा ऑफर आणतात. तसेच, स्पाईस जेटनंतर, काही इतर विमान कंपन्या देखील ग्राहकांना शानदार ऑफर देऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: spicejet offer cheapest flight ticket in republic day sale know travel timing and booking dates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.