Anil Ambani Reliance Power Stock: अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी BSE मध्ये इंट्राडे दरम्यान रिलायन्स पॉवरचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक वाढून ३०.०७ रुपयांवर पोहोचला. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये ४१ टक्क्यांहून अधिक उसळी आली आहे. तसंच, ३० मार्चनंतर रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये ४८ टक्क्यांची वाढ झाली आहे. अनिल अंबानींच्या या पॉवर कंपनीचं मार्केट कॅप सोमवारी १२,३०० कोटी रुपयांच्या पार गेलं.
रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये ४८% वाढ
रिलायन्स पॉवरचा शेअर त्याच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून ४८ टक्क्यांनी वधारला आहे. ३० मार्च २०२६ रोजी कंपनीचा शेअर २०.२३ रुपयांवर होता, जो २७ एप्रिल २०२६ रोजी ३०.०७ रुपयांवर पोहोचला. गेल्या ५ दिवसात या शेअरमध्ये ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र, गेल्या ६ महिन्यांचा विचार केल्यास रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये ३२ टक्क्यांची घट झाली आणि गेल्या एका वर्षात हा शेअर २७ टक्क्यांनी घसरला आहे. ही कंपनी वीज निर्मिती क्षेत्राशी (Power Generation Industry) संबंधित आहे.
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
६ वर्षात १४३०% हून अधिक परतावा
अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या ६ वर्षात १४३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २४ एप्रिल २०२० रोजी रिलायन्स पॉवरचा शेअर १.९५ रुपयांवर होता, जो २७ एप्रिल २०२६ रोजी ३०.०७ रुपयांवर पोहोचला. गेल्या ५ वर्षांत या शेअरमध्ये ५१५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, या काळात शेअर ४.८५ रुपयांवरून ३० रुपयांच्या पार गेलाय. गेल्या ३ वर्षात या शेअर्समध्ये १४५ टक्क्यांहून अधिक तेजी आली आहे. रिलायन्स पॉवरच्या शेअरची ५२ आठवड्यांची उच्च पातळी ७६.४९ रुपये आहे, तर ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २०.२३ रुपये आहे.
कंपनीनं दिलेत बोनस शेअर्स
रिलायन्स पॉवरनं आपल्या भागधारकांना बोनस शेअर्सची भेटही दिली आहे. मे २००८ मध्ये कंपनीनं ५:३ बोनस शेअर्स दिले होते. म्हणजेच, कंपनीने आपल्या भागधारकांना प्रत्येक ५ शेअर्सवर ३ बोनस शेअर्स वाटले होते. रिलायन्स पॉवरमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा २४.९८ टक्के आहे, तर पब्लिक शेअर होल्डिंग ७५.०२ टक्के आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
