Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एक डील अन् TATAचा शेअर बनला रॉकेट, झटक्यात 20% चं लागलं अप्पर सर्किट; तुमच्याकडे आहे का?

एक डील अन् TATAचा शेअर बनला रॉकेट, झटक्यात 20% चं लागलं अप्पर सर्किट; तुमच्याकडे आहे का?

...यामुळे येत्या काही महिन्यांत या शेअरच्या किंमतीत सुधारणा होण्याची आशा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 18:27 IST2026-02-26T18:27:12+5:302026-02-26T18:27:43+5:30

...यामुळे येत्या काही महिन्यांत या शेअरच्या किंमतीत सुधारणा होण्याची आशा आहे.

Share market One deal and tata company tejas networks ltd share rocketed the upper circuit jumped 20% in a flash Do you have it | एक डील अन् TATAचा शेअर बनला रॉकेट, झटक्यात 20% चं लागलं अप्पर सर्किट; तुमच्याकडे आहे का?

एक डील अन् TATAचा शेअर बनला रॉकेट, झटक्यात 20% चं लागलं अप्पर सर्किट; तुमच्याकडे आहे का?


शेअर बाजारातील टाटा समूहातील तेजस नेटवर्क्स लिमिटेडच्या शेअर्सने गुरुवारी (२६ फेब्रुवारी) जबरदस्त उसळी घेतली. सुरुवातीच्या व्यवहारात हा शेअर तब्बल २० टक्क्यांनी वधारून थेट ३८१.३५ रुपयांवर पोहोचला. जपानच्या 'एनईसी कॉर्पोरेशन' (NEC Corporation) सोबत ५जी मॅसिव्ह मिमो (MIMO) रेडिओच्या निर्मिती आणि पुरवठ्यासाठी करार केल्याची घोषणा कंपनीने केल्यानंतर गुंतवणूकदार या शेअरच्या खरेदीसाठी तुटून पडले.

तेजस नेटवर्क्सने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, कंपनी ४जी आणि ५जी रेडिओ ॲक्सेस नेटवर्क (RAN) शी संबंधित प्रगत उत्पादने तयार करते. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हाय-कॅपॅसिटी ६४टीआर मॅसिव्ह मिमो रेडिओचा समावेश असून, जे आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करतात. यामुळे टेलिकॉम कंपन्यांना वेगवान डेटा स्पीड आणि चांगली नेटवर्क क्षमता मिळण्यास मदत होईल. 

यासंदर्भात बोलताना कंपनीचे मुख्य परिचालन अधिकारी अर्नोब रॉय यांनी सांगितले की, या भागीदारीमुळे जागतिक स्तरावर प्रगत ५जी सोल्यूशन्स तयार होतील. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कंपनीची उपस्थिती आणखी मजबूत होऊ शकते.

कंपनीचा शेअर -
कंपनीचा शेअर ₹३४३.४५ वर व्यवहार करत होता, तो जवळपास ८.१% ने वधारला. तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की २०२५ मध्ये, हा स्मॉल-कॅप इंडेक्समधील सर्वात कमकुवत कामगिरी करणारा स्टॉक होता, जो ६०% पेक्षा जास्त घसरला. या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत स्टॉकमध्ये आदीच जवळपास २५% ची घसरण दिसून आली आहे. या नव्या कराराकडे अत्यंत आशेने आणि सकारात्मक दृष्टने बघितले जात आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत या शेअरच्या किंमतीत सुधारणा होण्याची आशा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title : डील के बाद टाटा के तेजस नेटवर्क्स के शेयर में 20% उछाल

Web Summary : एनईसी कॉर्पोरेशन के साथ 5जी रेडियो निर्माण के सौदे के बाद तेजस नेटवर्क्स के शेयरों में 20% की वृद्धि हुई। इस साझेदारी का उद्देश्य उन्नत 5जी समाधान बनाना है, जिससे कंपनी की वैश्विक उपस्थिति बढ़ सकती है और पिछले गिरावट के बाद इसके स्टॉक प्रदर्शन में सुधार हो सकता है।

Web Title : Tata's Tejas Networks Share Rockets 20% After Deal Announcement

Web Summary : Tejas Networks shares surged 20% after announcing a deal with NEC Corporation for 5G radio manufacturing. The partnership aims to create advanced 5G solutions, potentially boosting the company's global presence and improving its stock performance after a previous decline.