lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बिग बझारचा नवा मालक कोण? अंबानी-अदानीसह ४३ कंपन्या बोलीबाहेर, 'हे' आहे कारण

बिग बझारचा नवा मालक कोण? अंबानी-अदानीसह ४३ कंपन्या बोलीबाहेर, 'हे' आहे कारण

कर्जाची परतफेड करण्यासाठी, कंपनीचे मालक किशोर बियाणी यांनी फ्युचर रिटेलसह अनेक व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 10:28 AM2023-05-19T10:28:08+5:302023-05-19T10:29:04+5:30

कर्जाची परतफेड करण्यासाठी, कंपनीचे मालक किशोर बियाणी यांनी फ्युचर रिटेलसह अनेक व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला आहे.

reliance and adani group backed off from their initial move to acquire future group assets | बिग बझारचा नवा मालक कोण? अंबानी-अदानीसह ४३ कंपन्या बोलीबाहेर, 'हे' आहे कारण

बिग बझारचा नवा मालक कोण? अंबानी-अदानीसह ४३ कंपन्या बोलीबाहेर, 'हे' आहे कारण

देशात एकेकाळी बिग बझारचं नाव मोठं होतं. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स आणि अमेरिकन कंपनी अॅमेझॉन यांच्यात बिग बाजारवरून सामना सुरू होता. या दोघांच्या भांडणात फ्युचर रिटेल ही बिग बाजार चालवणारी कंपनीचा मोठा तोटा झाला होता. ही कंपनी आधीच कर्जात होती. कर्जाची परतफेड करण्यासाठी, कंपनीचे मालक किशोर बियाणी यांनी फ्युचर रिटेलसह अनेक व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला आणि नंतर रिलायन्सशी करार केला. मात्र कायदेशीर अडथळ्यांमुळे तो करार होऊ शकला नाही. त्यानंतर आता किशोर बियाणी यांची कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे, हे प्रकरण एनसीएलटीमध्ये आहे. 

अ‍ॅमेझॉनवरून खरेदी महागणार! 31 मे पासून कंपनी वेगवेगळ्या शुल्कात मोठी वाढ करणार

सुरुवातीला रिलायन्स-अदानी समूहासह ४९ कंपन्यांनी फ्युचर रिटेल खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले. पण आता ताजे अपडेट असे आहे की देशातील दोन सर्वात मोठे अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी फ्युचर ग्रुपची मालमत्ता खरेदी करण्याच्या शर्यतीपासून स्वतःला दूर केले आहे. आता फक्त ६ कंपन्या या शर्यतीत आहेत. म्हणजे ४३ कंपन्यांनी आता या शर्यतीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

एका अहवालानुसार, अदानी आणि अंबानी समूहाने फ्युचर ग्रुपच्या मालमत्तेचे मोठे मूल्यांकन केल्यामुळे बोली न लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाबाबत दोन्ही व्यापारी गटांकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.रिलायन्स समूह फ्युचरच्या अनेक मालमत्ता खरेदी करण्यास उत्सुक होता. Reliance FBB, CENTRAL सारखे ब्रँड खरेदी करण्यात स्वारस्य आहे. याशिवाय रिलायन्सचा फ्युचर ग्रुपच्या मालमत्ता वेअरहाउसिंग आणि वेगवेगळ्या ठिकाणी पुरवठा साखळीवर नजर होती. मात्र महागड्या मूल्यांकनामुळे रिलायन्सला निर्णय पुढे ढकलावा लागला. मालमत्तेचे मूल्यांकन ९,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. 

याशिवाय अदानी समूहानेही बोलीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. आता फक्त ६ कंपन्या या शर्यतीत आहेत, यामध्ये मोठे नाव नाही. अंतिम फेरीसाठी आता या ६ कंपन्यांमध्ये स्पर्धा होणार आहे. त्यात स्पेस मंत्रा, पिनॅकल एअर, पल्गुन टेक एलएलसी, लेहार सोल्युशन्स, गुडविल फर्निचर आणि सर्वभिष्ट ई-वेस्ट मॅनेजमेंट कंपनी यांचा समावेश आहे. फ्युचर रिटेलवर सुमारे ३०,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. बिग बाजार चालवणारी कंपनी कंगाल झाली आहे. 

बिग बझारचे मालक किशोर बियाणी आहेत. काही वर्षापूर्वी हे नाव रिटेल किंग म्हणून ओळखले जात होते. बियाणी यांनी फ्युचर रिटेलच्या माध्यमातून रिटेल व्यवसायाचे संपूर्ण साम्राज्य उभे केले होते. पण ज्या पद्धतीने त्यांनी फ्युचर रिटेलला मजल दरमजल केले. आता ती त्याच स्पीडने खाली आली आहे. बिग बझारची सुरुवात कशी झाली? बिग बाजार हा फ्युचर रिटेलचा प्रमुख ब्रँड आहे. पण ते रातोरात एवढे मोठे नाव झाले असे नाही.कंपनी १९८७ मध्ये Manz Wear Private Limited या नावाने सुरू झाली. १९९१ मध्ये कंपनीचे नाव बदलून पॅंटालून फॅशन्स (इंडिया) लिमिटेड असे करण्यात आले. कंपनीचा IPO 1992 मध्ये आला होता. १९९४ मध्ये, पँटालून शॉपे नावाने देशव्यापी खास मेन्सवेअर स्टोअर सुरू करण्यात आले. कंपनीने देशातील मल्टी-ब्रँड रिटेल स्टोअर्सद्वारे ब्रँडेड कपड्यांची विक्री सुरू केली.

पँटलून रिटेलने २००१ मध्ये कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद येथे अवघ्या २२ दिवसांत तीन बिग बाजार स्टोअर उघडले. फूड बझार सुपरमार्केट चेन २००२ मध्ये सुरू झाली. यानंतर २००३ मध्ये बिग बाजारने नागपुरात स्टोअर उघडून टियर-२ शहरांमध्ये प्रवेश केला. २००७ मध्ये, कंपनीने कानपूरमध्ये आपले ५० वे स्टोअर उघडले. यावेळी बजारमध्ये गर्दीही वाढली. अनेकांनी खरेदीसाठी बिग बझारला पसंती दिली. 

किशोर बियाणी हे एचआर कॉलेज, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचा व्यवसाय प्रवास मुंबईत १९८० मध्ये स्टोन वॉश डेनिम फॅब्रिकच्या विक्रीतून सुरू झाला. स्वतःच्या लेबलची उत्पादने प्रत्येकासाठी उपलब्ध करून देण्याचे किशोर बियाणी यांचे स्वप्न होते आणि काही प्रमाणात ते त्यात यशस्वीही झाले. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी किशोर बियाणी यांनी पँटलून सुरू केले. बियाणी यांचा जन्म ९ ऑगस्ट १९६१ रोजी मुंबईत झाला. त्यांचा कुटुंबाचा व्यवसाय कापड व्यापारीचा होता. किशोर बियाणी यांच्यासाठी २०१९ हे वर्ष सर्वात त्रासदायक ठरले. त्यानंतर कोरोनामुळे संकट अधिक गडद झाले. कर्जामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने रेटिंग एजन्सींनीही पतमानांकन कमी केले. त्यामुळे फ्युचर रिटेलचे शेअर्स डबघाईला आले. 

Web Title: reliance and adani group backed off from their initial move to acquire future group assets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.