lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अ‍ॅमेझॉनवरून खरेदी महागणार! 31 मे पासून कंपनी वेगवेगळ्या शुल्कात मोठी वाढ करणार

अ‍ॅमेझॉनवरून खरेदी महागणार! 31 मे पासून कंपनी वेगवेगळ्या शुल्कात मोठी वाढ करणार

अ‍ॅमेझॉनवरून कमी किंमतीत वस्तू खरेदी करायच्या असतील तर ३१ मे पर्यंतचाच वेळ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 07:33 AM2023-05-19T07:33:25+5:302023-05-19T07:33:42+5:30

अ‍ॅमेझॉनवरून कमी किंमतीत वस्तू खरेदी करायच्या असतील तर ३१ मे पर्यंतचाच वेळ आहे.

Buying from Amazon will be expensive! From May 31, the company will increase the various charges | अ‍ॅमेझॉनवरून खरेदी महागणार! 31 मे पासून कंपनी वेगवेगळ्या शुल्कात मोठी वाढ करणार

अ‍ॅमेझॉनवरून खरेदी महागणार! 31 मे पासून कंपनी वेगवेगळ्या शुल्कात मोठी वाढ करणार

ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून वस्तूंची खरेदी करणे आता स्वस्त राहणार नाहीय. अ‍ॅमेझॉनवरून कमी किंमतीत वस्तू खरेदी करायच्या असतील तर ३१ मे पर्यंतचाच वेळ आहे. त्यानंतर कोणतीही वस्तू घेतली तर जादा पैसे द्यावे लागणार आहेत. अ‍ॅमेझॉन आपल्या सेलर फी आणि कमिशन चार्जमध्ये मोठा बदल करणार आहे. 

अ‍ॅमेझॉन प्रॉडक्ट रिटर्न फीला वाढविणार आहे. अ‍ॅमेझॉन व्हेंडरकडून कमिशन आणि फी गोळा करून कमाई करते. सुधारित शुल्क 31 मे 2023 पासून लागू केले जाणार असल्याचे कंपनीने अलिकडेच जाहीर केले होते. कपडे, सौंदर्य, किराणा आणि औषध अशा अनेक श्रेणींच्या दरात वाढ करणार आहे. 

Amazon वर 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या खरेदीसाठी 5.5 टक्के ते 12 टक्के विक्रेता शुल्क आकारले जाईल. 500 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर 15 टक्के सेलर फी लागू होईल. 1000 रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर 22.5 टक्के विक्रेता फी लागू होण्याची शक्यता आहे. सौंदर्य विभागात 300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांवर कमिशन 8.5 टक्के करण्यात येणार आहे. देशांतर्गत वितरण शुल्कातही सुमारे 20-23 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. एकंदरीतच ग्राहक म्हणून तुम्हाला आता ई कॉमर्स साईटवर जादा पैसे मोजावे लागणार आहेत. 

Web Title: Buying from Amazon will be expensive! From May 31, the company will increase the various charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.