lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Ration Card Rules: या 4 स्थितीत रद्द होईल आपलं रेशन कार्ड, सरकारनं जारी केले नवे नियम!

Ration Card Rules: या 4 स्थितीत रद्द होईल आपलं रेशन कार्ड, सरकारनं जारी केले नवे नियम!

...तर, अशा लोकांचे कार्ड तपासून रद्द केले जातील. अशा कुटुंबावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. तसेच, ते जेव्हापासून रेशन घेत आहेत, तेव्हापासूनच्या रेशनची वसुली केली जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 08:45 PM2023-03-23T20:45:04+5:302023-03-23T20:51:07+5:30

...तर, अशा लोकांचे कार्ड तपासून रद्द केले जातील. अशा कुटुंबावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. तसेच, ते जेव्हापासून रेशन घेत आहेत, तेव्हापासूनच्या रेशनची वसुली केली जाईल.

Ration Card new Rules Your ration card will be canceled in these 4 situations, new rules have been issued by the government | Ration Card Rules: या 4 स्थितीत रद्द होईल आपलं रेशन कार्ड, सरकारनं जारी केले नवे नियम!

Ration Card Rules: या 4 स्थितीत रद्द होईल आपलं रेशन कार्ड, सरकारनं जारी केले नवे नियम!

शिधापत्रिका अथवा रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card Holder) महत्त्वाची बातमी आहे. सध्या केंद्र सरकारकडून लाखो रेशन कार्डधारकांना मोफत रेशन सुविधा दिली जात आहे. सरकारने या वर्षी म्हणजे 2023 मध्येही शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशनचा लाभ मिळत राहील, असे जाहीर केले आहे. पण अनेक अपात्र लोकही मोफत रेशनचा लाभ घेत असल्याचे दिसून येते.

स्वतःहून रद्द करा रेशन कार्ड -
यामुळे सरकारकडून लोकांना आवाहन करण्यात येत आहे, की अशा लोकांनी स्वतःहून आपले रेशन कार्ड रद्द करावे. असे न केल्यास, सत्यापनानंतर अन्न पुरवठा विभागाची टीम स्वतः ते  रद्द करेल. अशा लोकांविरोधात कारवाईही केली जाऊ शकते. 

जाणून घ्या सरकारचा नियम -
जर एखाद्या कार्ड धारकाकडे स्वतःच्या उत्पादनातून 100 चौरस मीटरचा प्लॉट/ फ्लॅट अथवा घर, चार चाकी वाहन, ट्रॅक्टर, शस्त्र लायसन्स असेल, तसेच गावात दो लाख आणि शहरी भागात तीन लाखहून अधिक वार्षिक कौटुंबीक उत्पादन असेल तर अशा लोकांना आपले रेशन कार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे लागेल.

सरकार करेल कायदेशीर कारवाई - 
जर सरकारच्या नियमाप्रमाणे रेशन कार्ड धारकाने कार्ड सरेंडर केले नाही तर, अशा लोकांचे कार्ड तपासून रद्द केले जातील. अशा कुटुंबावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. तसेच, ते जेव्हापासून रेशन घेत आहेत, तेव्हापासूनच्या रेशनची वसुली केली जाईल.
 

Web Title: Ration Card new Rules Your ration card will be canceled in these 4 situations, new rules have been issued by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.