Lokmat Money > बिझनेस न्यूज > Nirmala Sitharaman: यंदाच या ५ सरकारी कंपन्या खासगी हातात देणार; निर्मला सीतारामन यांची घोषणा

Nirmala Sitharaman: यंदाच या ५ सरकारी कंपन्या खासगी हातात देणार; निर्मला सीतारामन यांची घोषणा

Nirmala Sitharaman on Privatization, Economy, RBI: केंद्रीय बँक त्यांचा पैसा पुन्हा मागे घेण्यासाठी अद्याप अर्थव्यवस्था तेवढ्या स्तरावर गेलेली नाही. आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था कोरोनाच्या दोन लाटांमधून सावरत आहे. आरबीआयलाही याची कल्पना आहे. यामुळे ते आपला पैसा लगेचच काढून घेणार नाहीत. महागाई रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही त्या म्हणाल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 07:53 PM2021-08-12T19:53:32+5:302021-08-12T19:54:54+5:30

Nirmala Sitharaman on Privatization, Economy, RBI: केंद्रीय बँक त्यांचा पैसा पुन्हा मागे घेण्यासाठी अद्याप अर्थव्यवस्था तेवढ्या स्तरावर गेलेली नाही. आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था कोरोनाच्या दोन लाटांमधून सावरत आहे. आरबीआयलाही याची कल्पना आहे. यामुळे ते आपला पैसा लगेचच काढून घेणार नाहीत. महागाई रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही त्या म्हणाल्या. 

privatization of BPCL, air india, Bhel and two other companies this Year: Nirmala Sitharaman to CII meet | Nirmala Sitharaman: यंदाच या ५ सरकारी कंपन्या खासगी हातात देणार; निर्मला सीतारामन यांची घोषणा

Nirmala Sitharaman: यंदाच या ५ सरकारी कंपन्या खासगी हातात देणार; निर्मला सीतारामन यांची घोषणा

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी गुरुवारी उद्योग विश्वाला आश्वासित करताना म्हटले की, सरकार आर्थिक विकास दराला गती देण्यासाठी प्रत्येक गरजेचे पाऊल उचलण्यासाठी तयार आहे. सीतारामन यांनी उद्योग मंडळाच्या (CII) वार्षिक बैठकीला संबोधित केले. कोरोना संकटाला रोखण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध उठविल्यानंतर अर्थव्यवस्थेत वेग आणि बदलाचे संकेत आहेत. (India recovery not yet at point for pulling back liquidity: Nirmala Sitharaman)

Rajya Sabha: राज्यसभेत त्या दिवशी मार्शल नव्हते, बाहेरचे लोक? व्यंकय्या नायडूंना मिळाला रिपोर्ट

सीतारामन म्हणाल्या की चालू आर्थिक वर्षात आजवर थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) मध्ये 37 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर परदेशी चलन साठा जुलैमध्ये वाढून 620 अब्ज डॉलरवर गेला आहे. अर्थ मंत्र्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी सरकार विकास, सुधारणांसाठी कटीबद्ध आहे. कोरोना महामारीतही सरकारने सुधारणा केल्या. गेल्या वर्षी सरकारने कृषी कायदे आणि कामगार सुधारणांना पुढे नेले. 

या सरकारी कंपन्यांचे खासगीकरण...
वेगाने पुढे जाणाऱ्या अर्थव्य़वस्थेत गुंतवणूक वाढविण्यासाठी उद्योग जगताला त्यांनी आवाहन केले. सरकार यंदा 1.75 लाख कोटी रुपयांची निर्गुंतवणूक करणार आहे. यासाठी एअर इंडिया, भारत पेट्रोलियम, बीईएमएल, शिपिंग कॉर्पोरेशन आणि कंटेनर कॉर्पोरेशन या सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले जाणार आहे. कोरोना काळात नुकसानग्रस्त झालेली अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी केंद्र सरकार आणि आरबीआय एकत्रितपणे काम करत आहेत, असे सीतारामन यांनी सांगितले.

केंद्रीय बँक त्यांचा पैसा पुन्हा मागे घेण्यासाठी अद्याप अर्थव्यवस्था तेवढ्या स्तरावर गेलेली नाही. आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था कोरोनाच्या दोन लाटांमधून सावरत आहे. आरबीआयलाही याची कल्पना आहे. यामुळे ते आपला पैसा लगेचच काढून घेणार नाहीत. महागाई रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही त्या म्हणाल्या. 
 

Web Title: privatization of BPCL, air india, Bhel and two other companies this Year: Nirmala Sitharaman to CII meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.