lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएफ व्याजदर ८.५५%; पाच वर्षांच्या नीचांकावर

पीएफ व्याजदर ८.५५%; पाच वर्षांच्या नीचांकावर

२0१७-१८ या वित्त वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सुमारे ५ कोटी सदस्यांच्या पीएफ खात्यावर ८.५५ टक्के दरानेच व्याज जमा करण्याचे आदेश कार्यालयांना दिले आहेत. हा तब्बल पाच वर्षांचा म्हणजेच २0१२-१३ नंतरचा नीचांकी व्याजदर ठरला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:38 AM2018-05-27T01:38:45+5:302018-05-27T01:46:38+5:30

२0१७-१८ या वित्त वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सुमारे ५ कोटी सदस्यांच्या पीएफ खात्यावर ८.५५ टक्के दरानेच व्याज जमा करण्याचे आदेश कार्यालयांना दिले आहेत. हा तब्बल पाच वर्षांचा म्हणजेच २0१२-१३ नंतरचा नीचांकी व्याजदर ठरला आहे.

 PF interest rate 8.55%; The five-year low | पीएफ व्याजदर ८.५५%; पाच वर्षांच्या नीचांकावर

पीएफ व्याजदर ८.५५%; पाच वर्षांच्या नीचांकावर

नवी दिल्ली - २0१७-१८ या वित्त वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सुमारे ५ कोटी सदस्यांच्या पीएफ खात्यावर ८.५५ टक्के दरानेच व्याज जमा करण्याचे आदेश कार्यालयांना दिले आहेत. हा तब्बल पाच वर्षांचा म्हणजेच २0१२-१३ नंतरचा नीचांकी व्याजदर ठरला आहे.
ईपीएफओने १२0 क्षेत्रीय कार्यालयांना कळवले आहे की, ८.५५ टक्के व्याजदरास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याचे श्रम मंत्रालयाने कळविले आहे. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने २१ फेब्रुवारी २0१८ च्या बैठकीत ८.५५ टक्के व्याजदर ठरविला होता. केंद्रीय श्रम मंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली होती. विश्वस्त मंडळाची शिफारस श्रम मंत्रालयाने मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठविली होती. वित्त मंत्रालयाने हा दर मंजूरही केला होता. तथापि, कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती.
२0१६-१७ या वित्त वर्षासाठी ईपीएफओ सदस्यांना ८.६५ टक्के दराने व्याज मिळाले होते. २0१५-१६ मध्ये ८.८ टक्के दराने, २0१४-१५ आणि २0१३-१४ मध्ये ८.७५ टक्के दराने, तर २0१२-१३ मध्ये ८.५ टक्के दराने व्याज मिळाले होते. अशा प्रकारे ८.५५ टक्के व्याजदर हा पाच वर्षांचा नीचांक ठरला आहे.

Web Title:  PF interest rate 8.55%; The five-year low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.