Lokmat Money > बिझनेस न्यूज > Mukesh Ambani News : मुकेश अंबानींची 'या' देशातील टेलिकॉम इंडस्ट्रीवर नजर, पाहा काय आहे प्लान?

Mukesh Ambani News : मुकेश अंबानींची 'या' देशातील टेलिकॉम इंडस्ट्रीवर नजर, पाहा काय आहे प्लान?

Mukesh Ambani News : भारतातील दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आपल्या व्यवसायाचा झपाट्यानं विस्तार करत आहेत. टेलिकॉम इंडस्ट्रीबद्दल ते अतिशय उत्साही दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:41 AM2024-05-27T11:41:17+5:302024-05-27T11:41:44+5:30

Mukesh Ambani News : भारतातील दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आपल्या व्यवसायाचा झपाट्यानं विस्तार करत आहेत. टेलिकॉम इंडस्ट्रीबद्दल ते अतिशय उत्साही दिसत आहेत.

Mukesh Ambani News eye on the telecom industry in ghana what is his plan know details | Mukesh Ambani News : मुकेश अंबानींची 'या' देशातील टेलिकॉम इंडस्ट्रीवर नजर, पाहा काय आहे प्लान?

Mukesh Ambani News : मुकेश अंबानींची 'या' देशातील टेलिकॉम इंडस्ट्रीवर नजर, पाहा काय आहे प्लान?

Mukesh Ambani News : भारतातील दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश (Mukesh Ambani) अंबानी आपल्या व्यवसायाचा झपाट्यानं विस्तार करत आहेत. टेलिकॉम इंडस्ट्रीबद्दल (Telecom Industries) ते अतिशय उत्साही दिसत आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कंपनी लवकरच वेगाने वाढणाऱ्या घाना मार्केटमध्ये आपली टेलिकॉम सुविधा पुरवताना दिसू शकते.
 

काय आहे प्लान?
 

एनजीआयसीचे (Next gen Infra Co) कार्यकारी संचालक हरकीरत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नियंत्रणाखालील कंपनी रेडिसिस कॉर्प (Radisys Corp) घानाच्या इन्फ्राकोला नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, अॅप्लिकेशन्स आणि स्मार्ट फोन पुरवणार आहे. एनजीआयसी या वर्षाच्या अखेरीस घानामध्ये एनजीसीआयच्या वतीने दूरसंचार सुविधा प्रदान करण्याची अपेक्षा आहे. घानामध्ये कंपनीकडून ५जी नेटवर्क आणि इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. झपाट्यानं वाढणाऱ्या या बाजारपेठेत वाजवी दरात सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं  ब्लूमबर्गशी बोलताना हरकीरत सिंग म्हणाले.
 

एनजीआयसीमध्ये अॅसेंड डिजिटल सोल्यूशन्स लिमिटेड आणि के-नेटचा एकूण हिस्सा ५५ टक्के असेल. तर घाना सरकारचा एकूण १० टक्के हिस्सा असेल. पुढील दशकभर एनजीआयसीकडे ५जी सेवा पुरविण्याचे विशेष अधिकार असतील, अशी हरकीरत सिंग यांनी दिली. पुढील तीन वर्षांत १४५ मिलियन डॉलर्स खर्च करण्याची कंपनीची योजना असल्याचंही त्यांनी म्हटलं.
 

एनजीआयसीमध्ये रिलायन्सचा वाटा किती?
 

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि त्याच्या कोणत्याही धोरणात्मक भागीदाराचा आयजीएनआयसीमध्ये कोणताही हिस्सा नसल्याचंही हरकीरत सिंग यांनी स्पष्ट केलंय.

Web Title: Mukesh Ambani News eye on the telecom industry in ghana what is his plan know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.