lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी सरकारचा मास्टर प्लॅन! प्रत्येकाचं उत्पन्न ₹10 लाख होणार, 2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार!

मोदी सरकारचा मास्टर प्लॅन! प्रत्येकाचं उत्पन्न ₹10 लाख होणार, 2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार!

भारताचे नाव आगामी काही वर्षांतच मोठ्या विकसित देशांमध्ये सामील होऊ शकसते. अनेक तज्ज्ञांचेही हेच मत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 02:53 PM2023-10-30T14:53:37+5:302023-10-30T14:54:40+5:30

भारताचे नाव आगामी काही वर्षांतच मोठ्या विकसित देशांमध्ये सामील होऊ शकसते. अनेक तज्ज्ञांचेही हेच मत आहे.

Modi government's master plan India will become 30 trillion economy by 2047 Everyone's income will be rs10 lakh, India will become a developed country by 2047 | मोदी सरकारचा मास्टर प्लॅन! प्रत्येकाचं उत्पन्न ₹10 लाख होणार, 2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार!

मोदी सरकारचा मास्टर प्लॅन! प्रत्येकाचं उत्पन्न ₹10 लाख होणार, 2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार!

जागतिक पातळीवर भारत, ही एक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक अर्थवयवस्था आहे. यामुळे भारताचे नाव आगामी काही वर्षांतच मोठ्या विकसित देशांमध्ये सामील होऊ शकसते. अनेक तज्ज्ञांचेही हेच मत आहे. यातच, भारत देश  2047 पर्यंत 30 ट्रिलियन इकोनॉमीचे टार्गेट पूर्ण करेल, असा अंदाज नीती आयोगाने वर्तवला आहे.

सध्या भारत देश 3.7 ट्रिलियन डॉलरच्या GDP सह जगातील पाच सर्वात मोठ्या आर्थव्यवस्थांमध्ये सामील आहे. 2030 पर्यंत भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकत जगातील तिसरी सर्वात मोठी इकोनॉमी होण्याचा अंदाज आहे. रेटिंग एजन्सी एसअँडपीनुसार 2030 पर्यंत, भारताचा नॉमिनल GDP 7.3 डॉलर ट्रिलियनपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. याशिवाय, नीती आयोगही भारताला 2047 पर्यंत 30 लाख कोटी डॉलरची विकसित अर्थव्यवस्था बनविण्याच्या दृष्टीने एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करत आहे.

30 ट्रिलियन डॉलरची इकोनॉमी होईल भारत -
नीती आयोगाचे CEO बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी नुकतेच म्हटले आहे की, भारताला 2047 पर्यंत सुमारे 30 ट्रिलियन डॉलर्सची विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी, एक व्हिजन डॉक्युमेंट तयार केले जात आहे. व्हिजन इंडिया 2047 साठीचा मसुदा डिसेंबर 2023 पर्यंत तयार होईल आणि पुढील तीन महिन्यांत सादर केला जाईल. यानंतर वेगाने पुढे जात असलेला भारत देश 24 वर्षांनंतरच्या लक्ष्याच्या दिशेने काम करण्यास सुरुवात करेल आणि आपला अंदाजित आकडा गाठेल.

याच बरोबर, वर्ल्ड बँकेच्या मते, 2047 मध्ये जेव्हा भारत 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, तेव्हा प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 12,000 डॉलर, म्हणजेच जवळपास 10 लाख रुपयांपेक्षाही अधिक असेल. नीती आयोगाच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, 2047 पर्यंत भारत विकसित देश बनण्यासाठी, त्याची अर्थव्यवस्था 2030 ते 2047 पर्यंत वर्षाला 9 टक्के वेगाने वाढणे आवश्यक आहे.

Web Title: Modi government's master plan India will become 30 trillion economy by 2047 Everyone's income will be rs10 lakh, India will become a developed country by 2047

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.