lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ISRO च्या 'गगनयान' मिशनपूर्वी 'या' कंपनीची लॉटरी; एका महिन्यात 49000 कोटींची कमाई

ISRO च्या 'गगनयान' मिशनपूर्वी 'या' कंपनीची लॉटरी; एका महिन्यात 49000 कोटींची कमाई

आधी चंद्रयान 3, नंतर आदित्य L1 आणि आता गगनयान मोहिमेत या कंपनीची महत्वाची भूमिका आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 01:53 PM2023-09-29T13:53:45+5:302023-09-29T13:55:16+5:30

आधी चंद्रयान 3, नंतर आदित्य L1 आणि आता गगनयान मोहिमेत या कंपनीची महत्वाची भूमिका आहे.

'L&T' company's lottery ahead of ISRO's 'Gagayan' mission; 49000 crores in one month increased in market cap | ISRO च्या 'गगनयान' मिशनपूर्वी 'या' कंपनीची लॉटरी; एका महिन्यात 49000 कोटींची कमाई

ISRO च्या 'गगनयान' मिशनपूर्वी 'या' कंपनीची लॉटरी; एका महिन्यात 49000 कोटींची कमाई

L&T Market Cap: आधी चंद्रयान 3, नंतर आदित्य L1 आणि आता गगनयान मोहिमेसाठी ISRO सज्ज झाले आहे. या तिन्ही मोहिमांमध्ये लार्सन अँड टुब्रो कंपनीचे मोठे योगदान मानले आहे. यामुळेच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होत आहे. 30 ऑगस्टपासून कंपनीच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या काळात कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 49 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. आजही कंपनीचे शेअर्स लाइफ टाइम हायवर पोहोचले आहेत.

मुंबई अथॉरिटीकडून कंपनीला 7 हजार कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्याची माहिती आहे. यापूर्वी सौदी आरामकोकडून सुमारे 4 अब्ज डॉलर्सची ऑर्डर मिळाली होती. कंपनीचा व्यवसाय तंत्रज्ञान आणि बांधकाम, या दोन्ही क्षेत्रात आहे. या दोन्ही क्षेत्रात कंपनीचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. 

कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ
लार्सन टुब्रोच्या शेअर्समध्ये शुक्रवारीही वाढ झाली. बीएसईच्या आकडेवारीनुसार, दुपारी 12:14 वाजता कंपनीचे शेअर्स 0.73 टक्क्यांनी म्हणजेच 22.10 रुपयांच्या वाढीसह 3033.95 रुपयांवर व्यवहार करत आहेत. दरम्यान, आज कंपनीच्या शेअर्सनी 3044.15 रुपयांनी व्यवहार सुरू केला. काल कंपनीचे शेअर्स 3011.85 रुपयांवर बंद झाले होते. सुमारे 3 तासांच्या ट्रेडिंग सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये 1.50 टक्क्यांची वाढ दिसून आली.

कंपनीचे शेअर्स लाईफटाईम हायवर
ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीच्या शेअर्सने उच्चांक गाठला आहे. आकडेवारीनुसार, शेअर्समध्ये 1.49 टक्क्यांनी वाढ झाली आणि दिवसभरात 3057 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. गेल्या वर्षी 29 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीने 1,798 रुपयांचा 52 आठवड्यांचा नीचांक गाठला होता. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांनी या काळात मोठी कमाई केली आहे. 

एका महिन्यात 49000 कोटी रुपयांचा नफा
गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, शेअरमध्ये सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 30 ऑगस्ट रोजी कंपनीचे शेअर्स 2708.80 रुपयांवर बंद झाले. 30 ऑगस्ट रोजी कंपनीचे मार्केट कॅप 3,80,762.12 कोटी रुपये होते. आज मार्केट कॅप 3057 रुपयांच्या उच्चांकासह 4,29,706.81 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याचा अर्थ कंपनीच्या एम कॅपमध्ये एका महिन्यात सुमारे 49 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Web Title: 'L&T' company's lottery ahead of ISRO's 'Gagayan' mission; 49000 crores in one month increased in market cap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.