lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आपणही LIC पॉलिसी घेतली असेल अथवा घेत असाल तर सावधान! ...अन्यथा बुडतील सर्व पैसे!

आपणही LIC पॉलिसी घेतली असेल अथवा घेत असाल तर सावधान! ...अन्यथा बुडतील सर्व पैसे!

फसवणूक करणारे हे लोक फोन केल्यानंतर स्वतःला एलआयसी कर्मचारी अथवा इरडाचे अधिकारी सांगतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 08:17 AM2021-05-25T08:17:05+5:302021-05-25T08:18:04+5:30

फसवणूक करणारे हे लोक फोन केल्यानंतर स्वतःला एलआयसी कर्मचारी अथवा इरडाचे अधिकारी सांगतात.

LIC customers beaware from fake calls and keep these things in mind | आपणही LIC पॉलिसी घेतली असेल अथवा घेत असाल तर सावधान! ...अन्यथा बुडतील सर्व पैसे!

आपणही LIC पॉलिसी घेतली असेल अथवा घेत असाल तर सावधान! ...अन्यथा बुडतील सर्व पैसे!

नवी दिल्ली - एलआयसी खातेधारकांसाठी (LIC Customers) महत्वाची बातमी आहे. जर आपणही एलआयसीकडून पॉलिसी (LIC Policy) घेतली असेल, तर सावध व्हा. कोरोना काळात फसवणुकीची प्रकरणं अत्यंत वेगाने वाढत आहेत. फसवणूक करणारे बँकेनंतर आता एलआयसी अधिकारी अथवा इरडाचे (IRDAI) अधिकारी बनून ग्राहकांना कॉल करत आहेत आणि त्यांच्या खात्यातून पैसे साफ करत आहेत. अशी अनेक प्रकरणं समोर येत असल्याने देशातील सर्वात मोठी इंश्योरन्स कंपनी एलआयसीने (LIC-Life Insurance Corporation of India) आपल्या ग्राहकांना अलर्ट केले आहे.

फसवणूक करणारे हे लोक फोन केल्यानंतर स्वतःला एलआयसी कर्मचारी अथवा इरडाचे अधिकारी सांगतात. यासंदर्भात LIC ने जारी केलेल्या अलर्टमध्ये म्हटले आहे, की कंपनी आपल्या ग्राहकांना कुठलीही पॉलिसी सरेंडर करण्याचा सल्ला देत नाही. कंपनीने ग्राहकांना आवाहन केले आहे, की अशा प्रकारच्या माहित नसलेल्या नंबरवरून फोन आल्यास अटेंड करू नका. एलआयसीने ग्राहकांना सल्ला दिला आहे, की त्यांनी आपली पॉलिसी एलआयसीच्या आधिकृत वेबसाइटवर रजिस्टर करावी आणि तेथेच सर्व प्रकारची माहिती मिळवावी.

LIC चे ट्विट -
LIC ने ट्विट करत म्हटले आहे, की ग्राहकांना पॉलिसीची चुकीची माहिती देऊन फसवणाऱ्या, अशा फोन कॉल्सपासून सर्व ग्राहकांनी सावध रहावे. याच बरोबर फसवणूक करणारे लोक ग्राहकांना LIC अधिकारी अथवा IRDAI अधिकारी बनून धोका देत आहेत. गेल्या काही दिवसांत पॉलिसीची रक्कम तत्काळ देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक झाली आहे.

LIC कडून पॉलिसीधारकांना दिलासा; लाइफ सर्टिफिकेटसाठी सुरू केली ‘ही’ सुविधा

- आपल्याला पॉलिसीसंदर्भात काही माहिती हवी असेल तर आपण अधिकृत वेबसाइट www.licindia.in वर जावून माहिती घेऊ शकता. कुठल्याही क्रमांकावर फोन करून पॉलिसीची माहिती घेऊ नका.

- या शिवाय बनावट फोन कॉल आल्यास आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा. याशिवाय आपण spuriouscalls@licindia.com या लिंकवरही रिपोर्ट करू शकतात.

- याशिवाय अशा प्रकारच्या कुठल्याही कॉलवर अधिक बोलू नका.

- ग्राहकांने आपली कुठल्याही प्रकारची माहिती शेअर करू नये.

- पॉलिसी सरेंडरसंदर्भात कुणालाही माहिती देऊ नका. तसेच आपल्याला अधिक फायदा मिळवून देण्यासंदर्भात कुणी भाष्य करत असेल, तर त्याच्यावर विश्वास ठेऊ नका. त्याला कुठल्याही प्रकारची माहिती देऊ नका.

येथे करा तक्रार -
आपल्याला अशा प्रकारचा फोन कॉल आल्यास, आपण co_crm_fb@licindia वर ईमेलद्वारे तक्रार नोंदवू शकता. ग्राहकांकडे LIC च्या वेबसाइटवर जाऊन ग्रीव्हांस रिड्रेसल ऑफिसरच्या डिटेल्स घेऊन त्याच्याशी संपर्क साधण्याचा पर्याय आहे.

Web Title: LIC customers beaware from fake calls and keep these things in mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.