lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' बँकेनं केली बचत खात्यावरील व्याजदरात मोठी कपात; नवे दर आजपासूनच लागू

'या' बँकेनं केली बचत खात्यावरील व्याजदरात मोठी कपात; नवे दर आजपासूनच लागू

कोरोना महासाथीचा बँकिंग क्षेत्रालाही बसलाय मोठा फटका. बँकेकडून मोठ्या प्रमाणात व्याजदर कपात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 04:02 PM2021-05-01T16:02:27+5:302021-05-01T16:04:41+5:30

कोरोना महासाथीचा बँकिंग क्षेत्रालाही बसलाय मोठा फटका. बँकेकडून मोठ्या प्रमाणात व्याजदर कपात.

IDFC First Bank cuts rates from six percent to 4 5 percent coronavirus effect saving account | 'या' बँकेनं केली बचत खात्यावरील व्याजदरात मोठी कपात; नवे दर आजपासूनच लागू

'या' बँकेनं केली बचत खात्यावरील व्याजदरात मोठी कपात; नवे दर आजपासूनच लागू

Highlightsकोरोना महासाथीचा बँकिंग क्षेत्रालाही बसलाय मोठा फटकाबँकेकडून मोठ्या प्रमाणात व्याजदर कपात

सध्या देशात कोरोना महासाथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. दिवसेदिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंदही होत आहे. अशा परिस्थितीत सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसताना दिसत आहे. तर दुसरीकडे बँकिंग क्षेत्राही यापासून दूर राहिलेलं नाही. IDFC बँकेनं आपल्या बचत खात्यांवरील व्याजदर आता कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक आपल्या बचत खात्यांवर ४ ते ५ टक्के दरानं व्याज देत आहे. १ मे पूर्वी हे दर ६ टक्के इतके होते. आजपासूनच हे दर लागू होत आहेत. बँकेनं आपल्या वेबसाईटवर यासंदर्भातील माहिती दिली आहे.

आयडीएफसी बँक १ मेपासून २ कोटी ते १० कोटी रूपयांच्या बचत खात्यावर ४ टक्के व्याज देईल. १० लाख ते २ कोटी रुपयांच्या खात्यांना ५ टक्के व्याज मिळेल. १० लाखांपर्यंतच्या बचत खात्यावर ४.५ टक्के व्याज देण्यात येईल. गेल्या चार महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा IDFC बँकेनं आपल्या बचत खात्यांच्या व्याजदरात कपात केली आहे. फेब्रुवारी महिन्यात बँकेनं बचत खात्यांवरील व्याज दर ७ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत कमी केले. गेल्या काही दिवसांमध्ये बँकेच्या चालू आणि बचत खात्यांचं प्रमाण वाढलं आहे.

आयडीएफसी बँकेनं याच महिन्यात क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे ३ हजार कोटी रूपये मिळवले आहेत. २०२१ च्या आर्थिक अंदाजानुसार, आयडीएफसी बँक अशी पहिली बँक होती ज्याच्या लोन बुकमध्ये १०.९ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. ती इंडस्ट्रियल ग्रोथपेक्षाही अधिक होती. 
 

Web Title: IDFC First Bank cuts rates from six percent to 4 5 percent coronavirus effect saving account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.