Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता 'ही' कंपनी 3200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार, सांगितलं मोठं कारण...

आता 'ही' कंपनी 3200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार, सांगितलं मोठं कारण...

नोकऱ्यांमध्ये कपात 3,000 पेक्षा जास्त अपेक्षित आहे, परंतु अंतिम संख्या निश्चित करणे बाकी आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 10:28 AM2023-01-09T10:28:52+5:302023-01-09T10:33:12+5:30

नोकऱ्यांमध्ये कपात 3,000 पेक्षा जास्त अपेक्षित आहे, परंतु अंतिम संख्या निश्चित करणे बाकी आहे. 

Goldman to Cut About 3200 Jobs This Week After Cost Review | आता 'ही' कंपनी 3200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार, सांगितलं मोठं कारण...

आता 'ही' कंपनी 3200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार, सांगितलं मोठं कारण...

नवी दिल्ली : गोल्डमन सच ग्रुप (Goldman Sachs Group) बुधवारपासून आपल्या फर्ममधील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. तसेच गोल्डमनकडून यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला आहे. नोकऱ्यांमध्ये कपात 3,000 पेक्षा जास्त अपेक्षित आहे, परंतु अंतिम संख्या निश्चित करणे बाकी आहे. 

ब्लूमबर्ग न्यूजने रविवारी सांगितले होते की, गोल्डमन जवळपास 3,200 लोकांना काढून टाकेल. कपातीचा बहुतांश बँकांच्या प्रमुख विभागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, परंतु गोल्डमनच्या गुंतवणूक बँकिंग विभागावर लक्ष केंद्रित झाले पाहिजे. अस्थिर जागतिक वित्तीय बाजाराचा परिणाम म्हणून संस्थात्मक बँकांना कॉर्पोरेट करारांमध्ये मोठ्या मंदीचा सामना करावा लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डमनच्या तोट्यात चालणाऱ्या ग्राहक व्यवसायातून शेकडो नोकऱ्याही गमावल्या जाण्याची शक्यता आहे. कारण, त्याच्या डायरेक्ट-टू-कंज्युमर युनिट मार्कसची योजना कमी करण्यात आली आहे.

दरम्यान, कंपनीवर आर्थिक संकट ओढवले असल्यामुळे ही कपात योजना बनवली आहे, असे म्हटले जात आहे. याचबरोबर, कंपनी आपल्या ग्राहक व्यवसायाची पुनर्रचना करण्यावर भर देत आहे. कंपनी अशा प्रकारची योजना बनवत आहे जेणेकरून ती आपला खर्च कमी करून आगामी मंदीसाठी स्वतःला तयार करू शकेल. रिटेल बँकिंग व्यवसायात कंपनीचे मोठे नुकसान होत आहे आणि अशा परिस्थितीत कर्मचारी कपात हाच एकमेव मार्ग आहे. गोल्डमॅन कंपनी जगभरात 49,000 हून अधिक लोकांना रोजगार देत असल्याची माहिती आहे. सध्या कंपनीत सुमारे 81,567  कर्मचारी काम करतात.

कंपनीने सांगितले कारण...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड सोलोमन (Chief Executive Officer David Solomon) यांनी 'मेन स्ट्रीट' बँकिंग महत्त्वाकांक्षा कमी करण्याच्या योजना जाहीर केल्यानंतर हे पाऊल पुढे आले आहे. हीच बँकिंग कंपनी मार्कस-ब्रँडेड रिटेल बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे वैयक्तिक कर्ज ऑफर करणे बंद करण्याचा विचार करत आहे. डेव्हिड सोलोमन यांनी ऑक्टोबरमध्ये घोषणा केली होती की, गोल्डमन अनेक वर्षांचे नुकसान आणि वाढत्या खर्चानंतर आपले रिटेल बँकिंग युनिट कमी करेल.

गोल्डमन कंपनी मंदीसाठी तयार
ही कपात कंपनीतील सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक कपातीव्यतिरिक्त असणार आहे. सहसा बँकिंग कंपन्या दरवर्षी असे करतात. गोल्डमन कंपनी देखील 2023 मध्ये संभाव्य मंदीसाठी तयार आहे. डेव्हिड सोलोमन म्हणाले की गोल्डमनने "काही खर्च कमी करण्याच्या योजना सुरू केल्या आहेत". त्याचे फायदे जाणवायला अजून थोडा वेळ लागेल."

Web Title: Goldman to Cut About 3200 Jobs This Week After Cost Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.