Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव

Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव

Gold Silver Rate Today: दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या सराफा बाजारात आज सोन्या आणि चांदीच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 11:52 IST2026-04-30T11:52:18+5:302026-04-30T11:52:18+5:30

Gold Silver Rate Today: दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या सराफा बाजारात आज सोन्या आणि चांदीच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत नवे दर.

Gold Silver Price Today mcx 30 april 2026 rise today Quickly check the price of 24K 22K and 18K gold | Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव

Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव

Gold Silver Rate Today: दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या सराफा बाजारात आज सोन्या आणि चांदीच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे. गुरुवार, ३० एप्रिल २०२६ रोजी 'मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया' म्हणजेच MCX वर सोन्याचा भाव १,४९,४४६ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,३९,९११ रुपये प्रति किलोवर उघडला. अखिल भारतीय सराफा संघाच्या माहितीनुसार, काल २९ एप्रिल रोजी सोन्याचा दर १,५२,००० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर २,४४,५०० रुपये प्रति किलोवर पोहोचला होता.

बुधवारी एमसीएक्सवर सोन्याची किंमत १,४९,१४४ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीची किंमत २,३८,१०१ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. कालच्या बंद भावाच्या तुलनेत आज सोन्यात सुमारे ३०० रुपये आणि चांदीमध्ये १,८१० रुपयांची वाढ झाली आहे.

Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 

'इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन' (IBJA) नुसार, काल २४ कॅरेट सोन्याचा भाव बाजार बंद होताना १,४७,९७० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला होता. पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय बँकांना व्याजदर स्थिर ठेवावे लागत आहेत. सोन्याच्या किमतींनी या वर्षाच्या सुरुवातीला मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत. असं असूनही, जानेवारी ते मार्च या काळात भारतीय खरेदीदारांनी मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीची खरेदी केली आहे. 'वर्ल्ड गोल्ड कौन्सिल'च्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मार्च या कालावधीत वार्षिक तत्त्वावर सोन्याच्या मागणीत १०% वाढ झाली. किमती उच्च असूनही भारतीय ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलची ही आकडेवारी दर्शवते.

लग्नसराईतील खरेदीवर परिणाम

सोन्या-चांदीच्या किमतींनी २९ जानेवारी रोजी आतापर्यंतचा उच्चांकी (ऑल टाइम हाय) विक्रम नोंदवला होता. त्यानंतर फेब्रुवारीमध्येही ही वाढ सुरूच राहिली. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी मध्यपूर्वेत सुरू झालेल्या तणावामुळे कमोडिटी बाजारावर दबाव वाढत गेला. या परिस्थितीतही भारतात सोन्या-चांदीच्या खरेदीत १०% वाढ झाली आहे. असं असलं तरी, वाढत्या किमतींमुळे मध्यमवर्गीय कुटुंबं त्रस्त आहेत. ज्या कुटुंबांमध्ये लग्नकार्य आहे, त्यांना नाईलाजानं जास्त पैसे देऊन खरेदी करावी लागत आहे.

काय आहेत नवे दर?

शहर२४ कॅरेट२२ कॅरेट१८ कॅरेट
दिल्ली₹1,50,810₹1,38,250₹1,13,140
मुंबई₹1,50,660₹1,38,100₹1,12,990
कोलकाता₹1,50,660₹1,38,100₹1,12,990
चेन्नई₹1,52,180₹1,39,490₹1,16,340
बंगळुरू₹1,50,660₹1,38,100₹1,12,990

Web Title : आज सोना-चांदी की कीमतों में उछाल: 24K, 22K, 18K सोने के रेट जांचें

Web Summary : भारतीय बाजारों में सोना और चांदी की कीमतों में तेजी आई है। एमसीएक्स पर सोना ₹1,49,446/10 ग्राम और चांदी ₹2,39,911/किलोग्राम पर खुली। ऊंची कीमतों के बावजूद, Q1 में सोने की मांग 10% बढ़ी। शादी के मौसम के खरीदारों को अधिक लागत का सामना करना पड़ रहा है। शहर के अनुसार दरें जांचें।

Web Title : Gold, Silver Prices Surge Today: Check Rates for 24K, 22K, 18K Gold

Web Summary : Gold and silver prices are rising in Indian markets. MCX gold opened at ₹1,49,446/10g, silver at ₹2,39,911/kg. Despite high prices, gold demand rose 10% in Q1. Wedding season buyers face higher costs. Check city-wise rates.