lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Go First Offer : स्वस्तात बुक करा फ्लाइट तिकीट, फक्त 13 ऑगस्टपर्यंत संधी!

Go First Offer : स्वस्तात बुक करा फ्लाइट तिकीट, फक्त 13 ऑगस्टपर्यंत संधी!

Independence Day sale 2022: इंडियन एअरलाइन गो फर्स्ट (GO FIRST) तुम्हाला स्वस्तात हवाई तिकीट बुक करण्याची संधी देत ​​आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 04:39 PM2022-08-10T16:39:12+5:302022-08-10T16:40:08+5:30

Independence Day sale 2022: इंडियन एअरलाइन गो फर्स्ट (GO FIRST) तुम्हाला स्वस्तात हवाई तिकीट बुक करण्याची संधी देत ​​आहे. 

go first sale book cheap flight tickets independence day sale 2022 check here all details | Go First Offer : स्वस्तात बुक करा फ्लाइट तिकीट, फक्त 13 ऑगस्टपर्यंत संधी!

Go First Offer : स्वस्तात बुक करा फ्लाइट तिकीट, फक्त 13 ऑगस्टपर्यंत संधी!

नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात अनेक कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी ऑफर आणली आहे. तुमचाही येत्या काही दिवसांत प्रवास करण्याचा प्लॅन असेल, तर तुम्ही आतापासून स्वस्तात तिकीट बुक करू शकता. इंडियन एअरलाइन गो फर्स्ट (GO FIRST) तुम्हाला स्वस्तात हवाई तिकीट बुक करण्याची संधी देत ​​आहे. 

या ऑफरचे नाव Go First Independence Day Sale असे आहे. दरम्यान, तुम्ही मर्यादित वेळेसाठी बुक करू शकता. तुम्ही 10 ऑगस्टपासून म्हणजे आजपासून 13 ऑगस्टपर्यंत बुक करू शकता. या सेलमध्ये तुम्हाला फक्त 1508 रुपयांमध्ये एअर तिकीट मिळेल.

गो फर्स्टने आपल्या अधिकृत ट्विटवर या ऑफरबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये कंपनीने लिहिले आहे की, तुम्ही तुमचा ट्रॅव्हल मोड प्लॅन ऑन करू शकता. कंपनीने तुमच्यासाठी इंडिपेंडन्स सेल आणला आहे. या सेलमध्ये तिकीट बुकिंगची स्थिती चेक करा....

- या ऑफरअंतर्गत, तुम्ही 10 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2022 दरम्यान बुक करू शकता.
- या ऑफरमध्ये बनवलेल्या तिकिटांतर्गत तुम्ही 1 सप्टेंबर ते 31 मार्च 2023 पर्यंत प्रवास करू शकता.
- ही ऑफर सर्व चॅनेलवर लागू होऊ शकते.
- सेलमध्ये तिकिटांचे बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केले जाईल.
- ही ऑफर फक्त देशांतर्गत उड्डाणांवर लागू होईल.

कोठे बुकिंग करू शकता?
तिकिट बुक करण्यासाठी तुम्ही गो फर्स्टच्या अधिकृत वेबसाइट www.FlyGoFirst.com ला भेट देऊ शकता. याशिवाय, मोबाईल अॅपद्वारेही तिकीट बुकिंग करता येणार आहे. या ऑफरची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तिकीट रिफंडेबल आहे.

अधिकृत लिंक चेक करा
या ऑफरबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही https://www.flygofirst.com/offers-and-promotions/independence-day-sale/ या अधिकृत लिंकला देखील भेट देऊ शकता. येथे तुम्हाला ऑफरबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

Web Title: go first sale book cheap flight tickets independence day sale 2022 check here all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.