Lokmat Money > बिझनेस न्यूज > जेपी सिमेंटमध्ये गौतम अदानींचा मोठा पराभव! या मोठ्या कंपनीने डील जिंकली

जेपी सिमेंटमध्ये गौतम अदानींचा मोठा पराभव! या मोठ्या कंपनीने डील जिंकली

गौतम अदानी यांना सिमेंट व्यवसायात मोठा मोठा झटका बसला आहे. अदानी ग्रुपने जेपी सिमेंट ताब्यात घेण्याच्या तयारीत होता, पण जेपी ग्रुपने आपला सिमेंट व्यवसाय दालमिया सिमेंटला विकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 06:17 PM2022-12-12T18:17:00+5:302022-12-12T18:17:13+5:30

गौतम अदानी यांना सिमेंट व्यवसायात मोठा मोठा झटका बसला आहे. अदानी ग्रुपने जेपी सिमेंट ताब्यात घेण्याच्या तयारीत होता, पण जेपी ग्रुपने आपला सिमेंट व्यवसाय दालमिया सिमेंटला विकला आहे.

gautam adanis big defeat on jaypee cement this group defeated | जेपी सिमेंटमध्ये गौतम अदानींचा मोठा पराभव! या मोठ्या कंपनीने डील जिंकली

जेपी सिमेंटमध्ये गौतम अदानींचा मोठा पराभव! या मोठ्या कंपनीने डील जिंकली

गौतम अदानी यांना सिमेंट व्यवसायात मोठा मोठा झटका बसला आहे. अदानी ग्रुपने जेपी सिमेंट ताब्यात घेण्याच्या तयारीत होता, पण जेपी ग्रुपने आपला सिमेंट व्यवसाय दालमिया सिमेंटला विकला आहे. जेपी ग्रुपने आपला सिमेंट व्यवसाय 5,666 कोटी रुपयांना विकला आहे. करारावर जयप्रकाश असोसिएट्स आणि जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स यांनी स्वाक्षरी केली आहे.

एका अहवालानुसार, निर्गुंतवणुकीत एकूण 9.4 मिलियन टन क्षमतेचे सिमेंट प्लांट, 6.7 दशलक्ष टन क्षमतेचे क्लिंकर मालमत्ता आणि 280 मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्पाचा समावेश आहे. दालमिया भारतला सिमेंट मालमत्तेच्या निर्गुंतवणुकीतून मिळालेली रक्कम प्रामुख्याने जयप्रकाश असोसिएट्सच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली जाईल.

कंपनीने 2015 मध्ये दालमिया ग्रुपला एकूण 2 मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेसह सिमेंट युनिट्समधील कंट्रोलिंग स्टेक विकले. दिवाळखोरीतून बाहेर येण्यासाठी पाउले उचलण्यास कंपनीने सुरुवात केली आहे. 2014 आणि 2017 दरम्यान, जयप्रकाश असोसिएट्सने अल्ट्राटेक सिमेंटला 20 एमटीपीए क्षमतेच्या सिमेंट मालमत्ता विकल्या. सध्या दालमिया ग्रुपला विकले जाणारे सिमेंट आणि क्लिंकर क्षमता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आहेत.

भारतातील होलसिम ग्रुपची सिमेंट मालमत्ता विकत घेतलेल्या अदानी समूहाचा जयप्रकाश असोसिएट्सच्या सिमेंटवर डोळा होता आणि त्यांनी ती घेण्यासाठी 5,000 कोटी रुपयांची ऑफर दिली. अल्ट्राटेक सिमेंटनेही विकत घेण्याचे बोलले जात होते. 

Business Idea: नव्या वर्षात फक्त 50000 रुपयांत सुरू करा हा खास बिझनेस; होईल धडाक्यात कमाई, बाजारातही मोठी मागणी!

दालमिया सिमेंटची मूळ कंपनी दालमिया भारतचे समभाग 3 टक्क्यांनी वाढून रु. 1,906.30 वर बंद झाले कारण या अधिग्रहणामुळे कंपनीची स्थिती मार्केटमध्ये मजबूत होईल.

Web Title: gautam adanis big defeat on jaypee cement this group defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.