lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gautam Adani : अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याच्या मार्गावर, चिनी अब्जाधिशाला टाकलं मागे

Gautam Adani : अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याच्या मार्गावर, चिनी अब्जाधिशाला टाकलं मागे

Gautam Adani : सध्या आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हेच त्यांच्यापेक्षा एक क्रमांक पुढे आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 12:46 PM2021-05-19T12:46:09+5:302021-05-19T12:48:47+5:30

Gautam Adani : सध्या आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हेच त्यांच्यापेक्षा एक क्रमांक पुढे आहेत

gautam adani is just one place behind reliance mukesh ambani in Bloomberg Billionaires Index | Gautam Adani : अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याच्या मार्गावर, चिनी अब्जाधिशाला टाकलं मागे

Gautam Adani : अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याच्या मार्गावर, चिनी अब्जाधिशाला टाकलं मागे

Highlightsसध्या आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हेच त्याच्यापेक्षा एक क्रमांक पुढे आहेतBloomberg Billionaires Index मध्ये १३ व्या स्थानावर आहेत.

मंगळवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली होती. यामध्ये अदानी समुहाच्या कंपन्यांना (Adani Group) मोठा फायदा झाला होता. Bloomberg Billionaires Index नुसार यामुळे अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नेटवर्थमध्ये (Networth) २.७४ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. यानंतर सोमवारी त्यांचं नेटवर्थ ३.३१ अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास २४२३३ कोटी रूपये वाढलं. यानुसार गेल्या दोन दिवसांमध्ये त्यांच्या नेटवर्थमध्ये ६.०५ अब्ज डॉलर्स म्हणजेच ४४,२१३ कोटी रूपयांची वाढ झाली. यानंतर ६५.९ अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थसह ते श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ६ पायऱ्या वर येऊन १४ व्या क्रमांकावर आले आहे. चीनच्या झोंग शॅनशन यांना अदानी यांनी मागे टाकलं आहे, या यादीत आशियातील आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे १३ व्या क्रमांकावर आहेत. 

अदानी समुहाच्या लिस्टेड सहा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंगळवारीही तेजी दिसून आली होती. अदानी समुहाच्या शेअर्समध्ये यावर्षी मोठी वाढ दिसून आली. यामुळे अदानी यांचं नेटवर्थ यावर्षी ३२.१ अब्ज डॉलर्स वाढलं आहे. याचाच अर्थ त्यांच्या नेटवर्थमधील अर्धी कमाई याच वर्षी झाली. टाटा समुह आणि रिलायन्स इंडस्ट्रिजच्यानंतर अदानी समुह १०० अब्ज डॉलर्सच्या मार्केट कॅपपर्यंत पोहोचणारा तिसरा समूह ठरला आहे. 

देशातील मोठे उद्योजक मुकेश अंबनी (Mukesh Ambani) Bloomberg Billionaires Index मध्ये १३ व्या स्थानावर आहेत. यावर्षी त्यांच्या नेटवर्थमध्ये ४०.४ कोटी रूपयांची घट झाली. ७६.३ अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थसह ते आशियामध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. मंगळवारी रिलायन्सच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या नेटवर्थमध्ये १.१२ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. 
 

Web Title: gautam adani is just one place behind reliance mukesh ambani in Bloomberg Billionaires Index

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.