Lokmat Money > बिझनेस न्यूज > गौतम अदानी यांनी केवळ एकाच दिवसात कमावले 53,229 कोटी, इलॉन मस्क टॉप 3 मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर!

गौतम अदानी यांनी केवळ एकाच दिवसात कमावले 53,229 कोटी, इलॉन मस्क टॉप 3 मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर!

गौतम अदानी यांनी केवळ एकाच दिवसात कमावले 53,229 कोटी, इलॉन मस्क टॉप 3 मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 12:51 PM2024-03-15T12:51:19+5:302024-03-15T12:52:01+5:30

गौतम अदानी यांनी केवळ एकाच दिवसात कमावले 53,229 कोटी, इलॉन मस्क टॉप 3 मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर!

Gautam Adani Earns 53,229 Crores In Just One Day, Elon Musk On The Way Out Of Top 3 | गौतम अदानी यांनी केवळ एकाच दिवसात कमावले 53,229 कोटी, इलॉन मस्क टॉप 3 मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर!

गौतम अदानी यांनी केवळ एकाच दिवसात कमावले 53,229 कोटी, इलॉन मस्क टॉप 3 मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर!

अदानी समूहाच्या शेअर्सने दोन दिवसांच्या घसरणीनंतर जबरदस्त उसळी घेतली आहे. या दरम्यान समूहाच्या शेअरमध्ये 11 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे. यामुळे समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्या संपत्तीतही 6.42 अब्ज डॉलर अर्थात 53,229 कोटी रुपयांची तेजी आली आहे. ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार, अदानी 98.6 अब्ज डॉलर नेटवर्थसह जगातील श्रीमंतांच्या यादीत 14व्या स्थानावर पोहोचले आहेत. या वर्षी त्यांच्या संपत्तीत 14.3 अब्ज डॉलरची तेजी आली आहे. गुरुवारच्या तेजीसह अदानी समूहाच्या सर्व लिस्टेड कंपन्यांचे कंबाइन्ड मार्केट कॅप 15.66 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

अदानी समूहाच्या सर्वच लिस्टेड कंपन्यांच्या शेअरमध्ये गुरुवारी तेजी दिसून आली आहे. बीएसईवर अदानी टोटल गॅसचा शेअर 11.34%, अदानी एनर्जी सॉल्यूशन्स 11.10%, अदानी ग्रीन एनर्जी 9.66%, अदानी एंटरप्राइजेस 6.29% आणि अदानी पोर्ट्स 4.93% ने वधारला आहे. याच बरोबर, एनडीटीव्हीचा शेअर 4.82%, अदानी विल्मरचा शेअर 4.40%, एसीसीचा शेअर 4.11%, अंबुजा सीमेंट्सचा शेअर 4.04% आणि अदानी पॉवरचा शेअर 1.81% ने वधारला आहे. बुधवारच्या घसरणीनंतर, या कंपन्यांच्या एकत्रित बाजार मूल्यांकनात 1.12 लाख कोटी रुपयांची घसरण झाली होती.

चौथ्या क्रमांकावर घसरू शकतात मस्क -
दरम्यान, गुरुवारी इलॉन मस्क यांच्या संपत्तीत 5.02 अब्ज डॉलरची घट झाली. यामुळे त्यांची एकूण संपत्ती 179 अब्ज डॉलरवर आली आहे. या वर्षात त्यांची एकूण संपत्ती 49.6 अब्ज डॉलरने घसरली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर असून चौथ्या क्रमांकावर घसरण्याच्या मार्गावर आहेत.

सध्या मार्क झुकरबर्ग 177 अब्ज डॉलरसह चौथ्या क्रमांकावर आहेत. तर फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड आरनॉल्ट 204 अब्ज डॉलरसह पहिल्या क्रमांकावर आहेत. तर जेफ बेजोस 201 अब्ज डॉलरसह दुसऱ्या स्थानावर आहेत. 

Web Title: Gautam Adani Earns 53,229 Crores In Just One Day, Elon Musk On The Way Out Of Top 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.