lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सिमेंटपाठोपाठ आता अदानी समूह आरोग्य क्षेत्रात उतरणार; ४ अब्ज डॉलरची गुंतवणूक

सिमेंटपाठोपाठ आता अदानी समूह आरोग्य क्षेत्रात उतरणार; ४ अब्ज डॉलरची गुंतवणूक

गौतम अदानी समूहाने पूर्ण मालकीची अदानी हेल्थ व्हेंचर्स लिमिटेड कंपनी स्थापन केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 09:43 AM2022-05-20T09:43:06+5:302022-05-20T09:43:40+5:30

गौतम अदानी समूहाने पूर्ण मालकीची अदानी हेल्थ व्हेंचर्स लिमिटेड कंपनी स्थापन केली आहे.

following the cement adani group will now enter the health sector 4 billion investment | सिमेंटपाठोपाठ आता अदानी समूह आरोग्य क्षेत्रात उतरणार; ४ अब्ज डॉलरची गुंतवणूक

सिमेंटपाठोपाठ आता अदानी समूह आरोग्य क्षेत्रात उतरणार; ४ अब्ज डॉलरची गुंतवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सिमेंटपाठोपाठ आता अदानी समूह आरोग्य क्षेत्रात उतरणार आहे. अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूह मोठे हॉस्पिटल्स, डायग्नोस्टिक साखळी आणि फार्मसींचे अधिग्रहण करीत या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. यासाठी नवीन कंपनीही स्थापन करण्यात आली असून, तब्बल ४ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

समूहाने यासाठी पूर्ण मालकीची उपकंपनी अदानी हेल्थ व्हेंचर्स लि. (एएचव्हीएल) स्थापन केली आहे. कंपनी आरोग्य तंत्रज्ञानावर आधारित सुविधा, संशोधन केंद्रे इ. स्थापन करेल. आरोग्य क्षेत्रात प्रवेशसाठी समूह अनेक मोठ्या कंपन्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारकडील एचएलएलला ताब्यात घेण्यासाठी कंपनीने बोली लावली आहे.

Web Title: following the cement adani group will now enter the health sector 4 billion investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.