Marathi News : मुंबई : अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची भीती वाहन खरेदीदारांमध्ये असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये भारतातील इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) बाजाराने दमदार विक्री नोंदवली आहे. एप्रिल २०२६ मध्ये देशभरात तब्बल २ लाख ३९ हजार २५ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली असून हा एप्रिल महिन्यातील आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा ठरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ४१ टक्क्यांहून अधिक आहे.
वाहन मंत्रालयाच्या ‘वाहन’ पोर्टलवरील आकडेवारीनुसार, एप्रिल २०२५ मध्ये १ लाख ६९ हजार ३६० ईव्ही नोंदण्या झाल्या होत्या. त्याच्या तुलनेत यंदाची वाढ भारतीय ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची वाढती स्वीकारार्हता दर्शवते.
एप्रिलमध्ये काेणत्या प्रकारच्या ईव्हीची किती नाेंदणी?
विभाग नोंदणी वार्षिक वाढ
एकूण ईव्ही २,३९,०२५ ४१.४%
इलेक्ट्रिक दुचाकी १.४९ लाख २१%+
इलेक्ट्रिक कार २३,२२७ ४०%+
इलेक्ट्रिक तीनचाकी ६४,५०० २२%
उद्योगासमोर काही आव्हानेही
जरी ईव्ही क्षेत्र वेगाने वाढत असले तरी आगामी काळात काही आव्हाने कायम राहू शकतात. संभाव्य अल निनो प्रभाव, ग्रामीण मागणीत होणारी घट आणि उत्पादन खर्चातील वाढ याचा वाहन विक्रीवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा उद्योग विश्लेषकांनी दिला आहे.
तरीदेखील, ग्राहकांचा बदलता दृष्टिकोन, वाढते पर्यावरण भान आणि सुधारत जाणारे तंत्रज्ञान लक्षात घेता भारतातील ईव्ही बाजार दीर्घकालीन वाढीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
योजनांचा मोठा परिणाम
‘पीएम ई-ड्राइव्ह’ योजनेसारख्या सरकारी प्रोत्साहन योजनांमुळे ईव्ही विक्रीला मोठा आधार मिळत असल्याचे उद्योग तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक कच्च्या तेलाच्या किंमतीतील अस्थिरता आणि पर्यावरणपूरक वाहनांकडे वाढणारा कल हे देखील ईव्ही विक्री वाढीमागील महत्त्वाचे घटक मानले जात आहेत.
कोणत्या कंपनीच्या वाहनांची नोंदणी अधिक
८,५०१
टाटा ईव्ही कार
३५,९८०
टीव्हीएस दुचाकी
