lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतात लवकरच लॉन्च होणार इलॉन मस्क यांची Starlink सेवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

भारतात लवकरच लॉन्च होणार इलॉन मस्क यांची Starlink सेवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

इलॉन मस्क यांना लवकरच संबंधित विभागाकडून मंजूरी मिळू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 05:33 PM2024-01-24T17:33:55+5:302024-01-24T17:34:25+5:30

इलॉन मस्क यांना लवकरच संबंधित विभागाकडून मंजूरी मिळू शकते.

Elon Musk's Starlink service to be launched in India soon, know complete details... | भारतात लवकरच लॉन्च होणार इलॉन मस्क यांची Starlink सेवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

भारतात लवकरच लॉन्च होणार इलॉन मस्क यांची Starlink सेवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Elon Musk Starlink: उद्योगपती इलॉन मस्क यांची कंपनी 'स्टारलिंक' लवकरच भारतात आपला व्यवसाय सुरू करणार आहे. स्टारलिंकला भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्यासाठी लवकरच भारत सरकारकडून मंजूरी मिळणार आहे. या सेवांच्या मदतीने भारतातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांची नेटवर्कशी संबंधित समस्या दूर होईल. स्टारलिंकने डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेडला शेअर होल्डिंग पॅटर्न स्पष्ट केल्यावरच कंपनीला मान्यता दिली जाईल. यानंतर दूरसंचार विभाग स्टारलिंकला लेटर ऑफ इंटेंट जारी करेल.

या विभागाकडे अधिकार

विभाग एक नोट तयार करत आहे, जी दूरसंचार सचिव नीरज मित्तल आणि दळणवळण मंत्री अश्वनी वैष्णव यांना मंजुरीसाठी दिली जाईल. एकदा त्यांची संमती मिळाल्यावर सॅटेलाइट कम्युनिकेशन विंग स्टारलिंकला मान्यता देईल. 2022 मध्ये स्टारलिंकने सॅटेलाइट सर्व्हिसेसद्वारे ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशच्या लायसेन्ससाठी अर्ज केला आहे. जिओ सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि वनवेब नंतर हा परवाना मिळवणारी स्टारलिंक ही तिसरी कंपनी ठरली आहे.

सॅटेलाईट आधारित ब्रॉडबँड सेवांसाठी DoT सध्या Starlink ला संमती देणार नाही. यानंतर स्टारलिंकला अर्थ स्टेशन उभारण्यासाठी भारतीय राष्ट्रीय अवकाश संवर्धन आणि प्राधिकरण केंद्राकडून मंजुरी घ्यावी लागेल. स्टारलिंकला एवढ्या मंजूरी मिळाल्या तरीही दूरसंचार विभागाकडून स्पेक्ट्रमची वाट पाहावी लागेल. Amazon चे satcom arm - Project Kuiper देखील भारतात GMPCS परवाना मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतात स्टारलिंकचा फायदा कोणाला होणार?
सॅटेलाइट कम्युनिकेशन्स किंवा सॅटकॉम 4G च्या बरोबरीने स्पीड देतात. ही स्पीड 100 मेगाबिट्स प्रति सेकंद (Mbps) पर्यंत आहे, परंतु 5G प्रमामे 10 गीगाबिट्स प्रति सेकंद (Gbps) पर्यंत नाही. स्टारलिंक युजर्सना 25 ते 220 Mbps दरम्यान डाउनलोड स्पीड मिळेल. कंपनीच्या वेबसाइटनुसार अपलोड स्पीड 5 ते 20 एमबीपीएस दरम्यान असेल. हे तंत्रज्ञान दुर्गम भागातील ग्राहकांसाठी फायदेशीर आहे. रिपोर्ट्सनुसार, या हाय स्पीड सेवेसाठी भारतीय ग्राहकांना दरमहा 7,425 रुपये मोजावे लागू शकतात.

Web Title: Elon Musk's Starlink service to be launched in India soon, know complete details...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.