lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Elon Musk यांचे Starlink आणतेय फ्लाइट इंटरनेट सर्व्हिस, जिओ-एअरटेलचं टेन्शन वाढणार?

Elon Musk यांचे Starlink आणतेय फ्लाइट इंटरनेट सर्व्हिस, जिओ-एअरटेलचं टेन्शन वाढणार?

ब्रिटिश एअरवेज ही पहिली अशी एअरलाइन होती, जिने इन-फ्लाइट इंटरनेट कनेक्टिव्हिटी सादर केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 07:34 PM2023-12-21T19:34:11+5:302023-12-21T19:35:14+5:30

ब्रिटिश एअरवेज ही पहिली अशी एअरलाइन होती, जिने इन-फ्लाइट इंटरनेट कनेक्टिव्हिटी सादर केली होती.

Elon Musk's Starlink is bringing in-flight internet service, Jio-Airtel tension will increase | Elon Musk यांचे Starlink आणतेय फ्लाइट इंटरनेट सर्व्हिस, जिओ-एअरटेलचं टेन्शन वाढणार?

Elon Musk यांचे Starlink आणतेय फ्लाइट इंटरनेट सर्व्हिस, जिओ-एअरटेलचं टेन्शन वाढणार?

इंटरनेट विश्वात इलॉन मस्क यांच्या सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिसचा जबरदस्त बोलबाला आहे. मात्र आता मस्क यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता फ्लाइट अर्थात विमानात इंटरनेट सर्व्हिस कमर्शियली ऑफर करण्याची मस्क यांची योजना आहे. यामुळे जिओ आणि एअरटेलचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. तर जाणून घेऊयात इन-फ्लाइट इंटरनेट सर्व्हिस संदर्भात...

हवेत मिळणार जबरदस्त स्पीड -
इलॉन मस्क यांची इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी इन-फ्लाइट सर्व्हिस ऑफर करण्याच्या तयारीत आहे. ही सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस स्टारलिंककडून लवकरच लॉन्च केली जाऊ शकते. इन-फ्लाइट इंटरनेटची कॉन्सेप्ट 2003 मध्ये सादर करण्यात आली होती. ही कन्सेप्ट सर्व प्रथम बोइंगकडून बिट्रिश एअरवेजने रोलआऊट केली होती. ब्रिटिश एअरवेज ही पहिली अशी एअरलाइन होती, जिने इन-फ्लाइट इंटरनेट कनेक्टिव्हिटी सादर केली होती.

इन-फ्लाइट इंटरनेट सर्व्हिस? -
ही टेक्नॉलॉजी बरीच जुनी आहे. जी एअरलाइन्स ग्राउंड स्टेशन्सवर अवलंबून होती. जी जमिनीवर उड्डाण करताना सिग्नल रिले करत होती आणि समुद्रातून उड्डाण करताना सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीवर स्विच करत होती. मात्र, ही इन-फ्लाइट इंटनरेट कनेक्टिव्हिटी अत्यंत स्लो होती. पण आता 20 वर्षांनंतर, इन-फ्लाइट इंटरनेट सर्व्हिस फास्ट इंटरनेट ऑफर करत आहे. यामुळे प्रवाशांना चांगली सर्व्हीस मिळते.

Web Title: Elon Musk's Starlink is bringing in-flight internet service, Jio-Airtel tension will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.