lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ट्विटरच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ; एलन मस्क ७५ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

ट्विटरच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ; एलन मस्क ७५ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

ट्विटरकडे ७५०० कर्मचारी आहेत. त्यापैकी ७५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची आपल्याकडे योजना असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 10:27 AM2022-10-21T10:27:04+5:302022-10-21T10:27:35+5:30

ट्विटरकडे ७५०० कर्मचारी आहेत. त्यापैकी ७५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची आपल्याकडे योजना असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. 

Elon Musk will lay off 75 percent of Twitter employees after Deal reports | ट्विटरच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ; एलन मस्क ७५ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

ट्विटरच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ; एलन मस्क ७५ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

टेस्ला कंपनीचे सीईओ आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची ट्विटर डील दरवेळेला वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. एकदा या डीलमधून माघार घेतल्यानंतर पुन्हा मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. असे असले तरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. 

ट्विटर खरेदी केल्यानंतर मस्क ७५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकतात असे बोलले जात आहे. वॉशिंग्टन पोस्टने इंटर्व्ह्यू आणि कागदपत्रांच्या हवाल्याने याची माहिती दिली आहे. यानुसार मस्क यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना ही माहिती दिली आहे. ट्विटरकडे ७५०० कर्मचारी आहेत. त्यापैकी ७५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची आपल्याकडे योजना असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. 

ट्विटरच्या सध्याच्या व्यवस्थापनाने पुढील वर्षाच्या अखेरीस कंपनीच्या वेतनात सुमारे $800 दशलक्ष कपात करण्याची योजना तयार केली आहे. मात्र, सध्यातरी याबाबत ट्विटरकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. यामुळे मस्क यांची डील झाली काय किंवा नाही ट्विटरमध्ये येत्या काळात नोकर कपात सुरु होणार आहे हे नक्की आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. 

ट्विटरच्या एचआरने कर्मचाऱ्यांना अशी कोणती योजना नसल्याचे सांगितले आहे. परंतु कागदपत्रे कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यासाठी आणि पायाभूत सुविधा कमी करण्याच्या व्यापक योजना दर्शवतात. मात्र, कंपनीचा हा प्लॅन मस्क यांनी कंपनी विकत घेण्याच्या ऑफरपूर्वी केला असल्याचे अहवालात म्हटले आहे. एलोन मस्क यांनी या वर्षी १३ एप्रिल रोजी ट्विटर खरेदीची घोषणा केली होती. त्यांनी प्रति शेअर $54.2 या दराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म $44 बिलियनमध्ये विकत घेण्याची ऑफर दिली होती. पण नंतर स्पॅम आणि बनावट खात्यांमुळे त्याने तो करार थांबवला होता.

Web Title: Elon Musk will lay off 75 percent of Twitter employees after Deal reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.