Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इराण नाही, तर 'हा' मुस्लिम देश बनणार 'तेलाचा बादशाह'; भारताशी एकदम सलोख्याचे संबंध...

इराण नाही, तर 'हा' मुस्लिम देश बनणार 'तेलाचा बादशाह'; भारताशी एकदम सलोख्याचे संबंध...

Crude Oil: देशात सुरू झाले तेलाचे उत्पादन; जागतिक तेल बाजारासाठी सकारात्मक संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:44 IST2026-04-29T13:43:35+5:302026-04-29T13:44:17+5:30

Crude Oil: देशात सुरू झाले तेलाचे उत्पादन; जागतिक तेल बाजारासाठी सकारात्मक संकेत?

Crude Oil: Not Iran, but 'this' Muslim country will become the 'king of oil'; Perfectly harmonious relations with India | इराण नाही, तर 'हा' मुस्लिम देश बनणार 'तेलाचा बादशाह'; भारताशी एकदम सलोख्याचे संबंध...

इराण नाही, तर 'हा' मुस्लिम देश बनणार 'तेलाचा बादशाह'; भारताशी एकदम सलोख्याचे संबंध...

Crude Oil: पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जागतिक तेल बाजार अस्थिर झाला आहे. मात्र, आता अशा परिस्थितीत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारताचा शेजारी देश अफगाणिस्तान आता ऊर्जा क्षेत्रात नवी शक्ती म्हणून उदयास येत आहे.

अमू दरिया बेसिनमधून तेल उत्पादनाला सुरुवात

अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील जौजजान प्रांतात स्थित अमू दरिया तेल बेसिनमध्ये तेल उत्पादन सुरू झाले आहे. देशाच्या खाण आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, जमराड साई परिसरातील पाच विहिरींमधून सध्या दररोज सुमारे ५०० क्युबिक मीटर तेलाचे उत्पादन होत आहे. ही मात्रा सध्या कमी असली तरी, दशकांपासून युद्ध आणि आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या देशासाठी ही मोठी आणि आशादायक सुरुवात मानली जात आहे.

मोठ्या साठ्याची शक्यता

गेल्या सहा महिन्यांत या भागात सुमारे ४०० किलोमीटरचा सिस्मिक सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेमधून मोठ्या प्रमाणात तेल आणि वायू साठ्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जर उत्पादन वाढत राहिले आणि भविष्यात निर्यात सुरू झाली, तर अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळू शकतो.

जागतिक तेल बाजारासाठी सकारात्मक संकेत?

सध्या होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे. या मार्गावर तणाव वाढल्यास तेल पुरवठ्यावर थेट परिणाम होतो. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानसारख्या नव्या पुरवठादाराचा उदय हा जागतिक बाजारासाठी सकारात्मक संकेत ठरू शकतो.

भारत-अफगाणिस्तान व्यापाराला चालना 

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापार संबंध आधीपासून मजबूत आहेत. दोन्ही देशांमधील वार्षिक व्यापार १ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे. भारत अफगाणिस्तानला औषधे, यंत्रसामग्री, सोयाबीन मील आणि सिंथेटिक फॅब्रिक निर्यात करतो, तर अफगाणिस्तानकडून सुकामेवा, केशर, फळे आणि खनिज आयात केली जातात. या व्यापारात चाबहार पोर्ट महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण तो पाकिस्तानला वगळून भारत-अफगाणिस्तान दरम्यान थेट संपर्क साधतो. तसेच एअर कॉरिडॉरमुळेही व्यापाराला गती मिळाली आहे.

भारतासाठी स्वस्त पर्याय?

जर अफगाणिस्तान भविष्यात तेल निर्यातदार देश म्हणून विकसित झाला, तर भारतासाठी हा स्वस्त आणि जलद पर्याय ठरू शकतो. विशेषतः जेव्हा पारंपरिक मार्गांवर भू-राजकीय धोके वाढत आहेत, तेव्हा अफगाणिस्तानकडून होणारा पुरवठा भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो.

Web Title : अफ़ग़ानिस्तान तेल का बादशाह बनने की राह पर, भारत से रिश्ते मजबूत

Web Summary : अफ़ग़ानिस्तान ने अमू दरिया में तेल उत्पादन शुरू किया, जिससे ऊर्जा क्षमता बढ़ी। भूकंपीय सर्वेक्षण विशाल भंडार का संकेत देते हैं। चाबहार बंदरगाह से सुगम भारत के साथ बढ़ते व्यापार से सस्ता तेल और रणनीतिक साझेदारी मजबूत हो सकती है।

Web Title : Afghanistan Poised to Become Oil Giant, Strengthening Ties with India

Web Summary : Afghanistan starts oil production in Amu Darya, offering energy potential. Seismic surveys suggest vast reserves. Increased trade with India, facilitated by Chabahar port, could lead to cheaper oil and strengthened strategic partnership.