lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > coronavirus: १९ टक्के नोकरदारांनी काढली भविष्य निर्वाह निधीतली रक्कम

coronavirus: १९ टक्के नोकरदारांनी काढली भविष्य निर्वाह निधीतली रक्कम

गेल्या दोन महिन्यांत तर दररोज एक लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोविड आणि नॉन कोविड अशा दोन्ही श्रेणीतले क्लेम अदा केले जात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 06:15 AM2020-09-03T06:15:31+5:302020-09-03T06:15:55+5:30

गेल्या दोन महिन्यांत तर दररोज एक लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोविड आणि नॉन कोविड अशा दोन्ही श्रेणीतले क्लेम अदा केले जात आहेत.

coronavirus: 19% of employees withdraw money from provident fund | coronavirus: १९ टक्के नोकरदारांनी काढली भविष्य निर्वाह निधीतली रक्कम

coronavirus: १९ टक्के नोकरदारांनी काढली भविष्य निर्वाह निधीतली रक्कम

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे नोकरदारांवर कोसळलेल्या आर्थिक संकटाची धार कमी करण्यासाठी भविष्य निर्वाह निधीतली काही रक्कम काढण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. गेल्या पाच महिन्यांत पीएफ कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या सुमारे ५ कोटी ८१ लाखांपैकी १ कोटी १२ लाख नोकरदारांनी म्हणजे सुमारे १९ टक्के नोकरदारांनी भविष्यासाठी राखून ठेवलेली जवळपास २० हजार कोटींची रक्कम काढली आहे.

गेल्या दोन महिन्यांत तर दररोज एक लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोविड आणि नॉन कोविड अशा दोन्ही श्रेणीतले क्लेम अदा केले जात आहेत. भविष्य निर्वाह निधी योजनेचे सदस्य असलेल्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या एकत्रित रकमेच्या ७५ टक्के रक्कम म्हणजे जवळपास दीड महिन्याच्या वेतनाएवढी रक्कम खात्यातून काढण्याची मुभा (कोविड क्लेम) केंद्र सरकारने दिली आहे.
त्याशिवाय घरबांधणी, घर दुरुस्ती, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आदी सहा ते सात कारणांसाठीसुद्धा नोकरदारांना पीएफमधील पैसे काढण्याची मुभा (नॉन कोविड क्लेम) पूर्वीपासूनच आहे. कोरोना संकटामुळे आर्थिक घडी विस्कटलेले नोकरदार या दोन्ही पर्यायांचा वापर करून निवृत्तीनंतरची तजवीज म्हणून ठेवलेली रक्कम काढत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात सरासरी १५ लाख ८२ हजार कर्मचारी या दोन्ही पर्यायांचा वापर करून पैसे काढत होते. गेल्या दोन महिन्यांत ते प्रमाण सरासरी २६ लाख ७१ हजारांवर पोहोचले आहे.

याचाच अर्थ दररोज जवळपास १ लाख कर्मचारी आपली भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढू लागले आहेत. ३१ आॅगस्टपर्यंत ईपीएफओ कार्यालयाने १ कोटी १२ लाख क्लेम मंजूर करून ती रक्कम अर्जदारांच्या बँक खात्यामध्ये जमा केलीआहे. त्यात कोविडसाठी दिलेल्या विशेष पर्यायांचा वापर करून रक्कम काढणाºयांची संख्या सुमारे ५१ लाख आहे.तर, उर्वरित नोकरदारांनी परंपरागत पर्यायांचा वापर केला आहे. काही नोकरदारांनी दोन्ही पर्यायांचा वापर करून रक्कम काढल्याची माहिती या विभागातील अधिकाºयांनी दिली.

वेतन झाले कमी
अनेकांनी नोकºया गमावल्या असून
बहुतांश जणांचे वेतन कमी झाले आहे. काही जणांना काम केल्यानंतरही वेतन मिळत नाही. त्यामुळे दिवसागणिक या क्लेमची संख्या वाढत असल्याची माहिती या विभागातील अधिकाºयांनी दिली.

Web Title: coronavirus: 19% of employees withdraw money from provident fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.