lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोनाचा 'या' विमान कंपनीला फटका; सहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार

कोरोनाचा 'या' विमान कंपनीला फटका; सहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार

गेल्या काही दिवसांपूर्वी बोईंगने 12 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 06:40 PM2020-06-25T18:40:38+5:302020-06-25T19:03:53+5:30

गेल्या काही दिवसांपूर्वी बोईंगने 12 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती.

Australia's Qantas airline to cut 6,000 jobs as coronavirus hits | कोरोनाचा 'या' विमान कंपनीला फटका; सहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार

कोरोनाचा 'या' विमान कंपनीला फटका; सहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार

Highlightsक्वांटास विमान कंपनीने आपल्या 100 विमानांचे उड्डाण एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ बंद ठेवण्याचा विचार केला आहे.कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील विमान कंपन्यांना तोटा सहन करावा लागला आहे.

कोरोना संकट काळात विमान क्षेत्रात मोठा परिणाम झाला आहे. यामुळे जगभरातील विमान कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॉस्ट कटिंग किंवा कर्मचाऱ्यांची कपात  करण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. यातच आता ऑस्ट्रेलियाची प्रख्यात विमान कंपनी क्वांटास सुद्धा आहे. 

वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, या क्वांटास विमान कंपनीने सहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची तयारी केली आहे. याशिवाय, क्वांटास कंपनीने आपल्या 15,000 कर्मचार्‍यांना सुट्टीवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त क्वांटास विमान कंपनीने आपल्या 100 विमानांचे उड्डाण एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ बंद ठेवण्याचा विचार केला आहे. कंपनी आपल्या उर्वरित सहा बोईंग 747 विमाने त्वरित हटवणार आहे. त्याचबरोबर क्वांटासने आपली किंमत कोट्यावधी डॉलर्स कमी करून नवीन भांडवल वाढविण्याची घोषणा केली आहे.

"गेल्या काही वर्षांत कमी उत्पन्न मिळाल्यामुळे आता विमानसेवा खूपच कमी झाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांच्या करिअरमध्ये मोठा समस्या निर्माण झाली आहे. आम्ही घेत असलेल्या निर्णयामुळे आमच्या हजारो लोकांवर परिणाम होईल", असे एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन जॉयसी यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील विमान कंपन्यांना तोटा सहन करावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बोईंगने 12 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. तसेच, बोईंग या अमेरिकन कंपनीनेही आणखी काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचे संकेत दिले होते. बोईंगच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 1,60,000 आहे.

आणखी बातम्या...

ठाकरे मंत्रिमंडळाने घेतले 12 महत्त्वाचे निर्णय; वस्तू व सेवाकर अधिनियमात मोठी सुधारणा

शेतकऱ्याची कमाल! पिकवले अनोखे 'कलिंगड', बाहेरून 'हिरवे' अन् आतून 'पिवळे'

आयुक्तांच्या बदल्यांमागे एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न - प्रवीण दरेकर

 

Web Title: Australia's Qantas airline to cut 6,000 jobs as coronavirus hits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.