Lokmat Money > बिझनेस न्यूज > JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स

JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स

Jio Cinema Premium Plan : जिओ युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी कोणतीही जाहिरात न करता नवीन प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅन आणला आहे. पाहूया काय खास आहे यात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 08:48 AM2024-05-27T08:48:10+5:302024-05-27T08:49:22+5:30

Jio Cinema Premium Plan : जिओ युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी कोणतीही जाहिरात न करता नवीन प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅन आणला आहे. पाहूया काय खास आहे यात.

Another blast from Jio Cinema Premium annual plan available at unbelievable price rs 299 annually see details | JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स

JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स

Jio Cinema Premium Plan : जिओ युजर्ससाठी (Reliance Jio) आनंदाची बातमी आहे. रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी कोणतीही जाहिरात न करता नवीन प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅन आणला आहे. प्रीमियम कन्टेंटसाठी हा सर्वात स्वस्त सब्सक्रिप्शन प्लॅन पैकी एक मानला जातो. प्रीमियम अॅन्युअल या नावानं ही ऑफर सुरू करण्यात आली आहे. नव्या ॲड-फ्री प्रीमियम प्लॅनची किंमत १२ महिन्यांच्या कालावधीसाठी २९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे. ज्यांना ॲड फ्री कन्टेंटचा आनंद घ्यायचा आहे अशा ग्राहकांसाठी हा प्लॅन पर्वणीचं ठरणार आहे.

 

जिओ प्रीमियम अॅन्युअल प्लान
 

नव्या प्रीमियम ॲन्युअल प्लानमुळे तुम्हाला एका वर्षासाठी कोणत्याही जाहिरातीशिवाय 'प्रीमियम'सह सर्व कन्टेंटचा ॲक्सेस मिळणार आहे. याव्यतिरिक्त, तुम्हाला ४के क्वालिटीमध्ये कन्टेंटचा आनंद घेता येईल. याशिवाय मोबाइल ॲपवर ऑफलाइन मोडमध्येही कन्टेंट पाहता येणार आहे. कनेक्टेड टीव्हीसह कोणत्याही डिव्हाइसवर ग्राहकांना एक्सक्लुझिव्ह सीरिज, चित्रपट, हॉलिवूड कन्टेंट, किड्स शो आणि टीव्ही एंटरटेनमेंट पाहण्याची सुविधा यात मिळते.

काय आहेत फीचर्स?
 

जिओ सिनेमाच्या नव्या प्रीमियम प्लॅनची वैधता एक वर्षाची आहे. म्हणजेच १२ महिन्यांपर्यंत युजर्स प्लॅटफॉर्मवर देण्यात येणाऱ्या सर्व कन्टेंटचा आनंद घेऊ शकतात. यात एचबीओ, पॅरामाउंट आणि इतर प्रदात्यांकडून प्रीमियम कन्टेंटचादेखील समावेश आहे. मात्र, जिओनं एका वेळी किती स्क्रीनवर याचा अॅक्सेस मिळेल हे मात्र स्पष्ट केलेलं नाही.
 

न्युअल, मंथली प्लानची तुलना
 

जिओ सिनेमानं दिलेला वार्षिक प्लॅन मासिक प्लॅनपेक्षा उत्तम आहे. प्रमोशनल ऑफरमुळे मंथली सिंगल स्क्रीन प्लॅनची किंमत दरमहा २९ रुपये आहे. मात्र, वार्षिक हिशोब केला तर तो एकूण ३४८ रुपये येतो, जो नव्या २९९ रुपयांच्या प्लॅनपेक्षा ४९ रुपये अधिक आहे. 
 

जिओ सिनेमा प्रीमियम फॅमिली प्लान
 

JioCinema प्रीमियम फॅमिली प्लान २९९ रुपयांचा ॲन्युअल प्लॅन आणि २९ रुपयांच्या मंथली प्लानसह लाँन्च करण्यात आला आहे. याशिवाय जिओ ८९ रुपयांचा फॅमिली प्लानही ऑफर करते. ८९ रुपयांच्या फॅमिली प्लानमध्ये सिंगल स्क्रीन प्लॅनचे सर्व फायदे मिळतात, परंतु एकाच वेळी चार स्क्रीनचा अॅक्सेस मिळतो. युझर्सचा एकाच वेळी वेगवेगळ्या स्क्रीनवरही कन्टेंटचा आनंद घेता येतो.

Web Title: Another blast from Jio Cinema Premium annual plan available at unbelievable price rs 299 annually see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.