Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आधार–LPG गॅस कनेक्शन लिंक केलं नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान; आजच पूर्ण करा महत्त्वाचं काम, 'ही' आहे प्रोसेस

आधार–LPG गॅस कनेक्शन लिंक केलं नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान; आजच पूर्ण करा महत्त्वाचं काम, 'ही' आहे प्रोसेस

Aadhaar LPG Link: आधार एलपीजीला लिंक केलं नाही तर तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पाहा काय म्हटलंय सरकारनं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 08:25 IST2026-01-20T08:23:40+5:302026-01-20T08:25:05+5:30

Aadhaar LPG Link: आधार एलपीजीला लिंक केलं नाही तर तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पाहा काय म्हटलंय सरकारनं.

Aadhaar LPG gas connection liking is must you may suffer a big loss no subsidy Complete this important task today step by step process | आधार–LPG गॅस कनेक्शन लिंक केलं नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान; आजच पूर्ण करा महत्त्वाचं काम, 'ही' आहे प्रोसेस

आधार–LPG गॅस कनेक्शन लिंक केलं नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान; आजच पूर्ण करा महत्त्वाचं काम, 'ही' आहे प्रोसेस

Aadhaar LPG Link: सरकारनं गॅस सबसिडी आणि इतर सरकारी लाभ मिळवण्यासाठी एलपीजी गॅस कनेक्शन आधारशी लिंक करणं अनिवार्य केलं आहे. आधार-LPG लिंकिंगचा उद्देश लाभार्थ्यांची ओळख सुरक्षित करणं आणि बनावट किंवा डुप्लिकेट क्लेम रोखणं हा आहे. जर तुम्ही एलपीजी कनेक्शन घेतलं असेल आणि अद्याप ते आधारशी लिंक केले नसेल, तर तुम्हाला सबसिडी मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करणे शहाणपणाचं ठरेल. हे अत्यंत सोपं आहे आणि याचे अनेक मार्ग आहेत. आधारला एलपीजी गॅस कनेक्शनशी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी लिंक करता येतं.

लिंक करण्यासाठी भरावे लागतील दोन फॉर्म

एलपीजी गॅस कनेक्शन आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला दोन फॉर्म भरावे लागतील - फॉर्म १ आणि फॉर्म २ आणि ते तुमच्या एलपीजी कनेक्शन प्रोव्हायडरकडे जमा करावे लागतील. फॉर्म १ हा एलपीजी ग्राहकांसाठी बँक खातं आधारशी लिंक करण्याचा फॉर्म आहे, तर फॉर्म २ हा एलपीजी लिंकिंग फॉर्म आहे. तुम्ही हे फॉर्म ऑनलाइन डाउनलोड करू शकता किंवा एलपीजी वितरकाच्या कार्यालयात जाऊन मिळवू शकता.

आधार-LPG लिंक करण्याची ऑनलाइन पद्धत

सर्वात आधी हे समजून घ्या की एलपीजी आधार लिंकिंग पूर्णपणे ऑनलाइन होत नाही. तुम्ही फक्त फॉर्म डाउनलोड करू शकता, जो नंतर जमा करावा लागतो.

  • स्टेप १: तुमच्या एलपीजी गॅस कनेक्शन प्रोव्हायडरच्या (उदा. इंडेन, भारत गॅस, एचपी गॅस) अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • स्टेप २: ‘LPG Services’ सेक्शनमध्ये जाऊन ‘Join DBTL using Aadhaar’ किंवा ‘Download Forms’ या पर्यायावर क्लिक करा.
  • स्टेप ३: फॉर्म १ (बँक खातं-आधार लिंक अर्ज) आणि फॉर्म २ (LPG आधार लिंकिंग फॉर्म) हे दोन्ही फॉर्म डाउनलोड करून त्यांची प्रिन्ट काढा.
  • स्टेप ४: फॉर्म १ भरा, त्यासोबत आधार कार्डची प्रत जोडा आणि तुमच्या बँकेत किंवा एलपीजी डिस्ट्रीब्यूटर ऑफिसमध्ये जमा करा. यामुळे तुमचे आधार बँक खात्याशी एलपीजीसाठी लिंक होईल.
  • स्टेप ५: फॉर्म २ भरा, आवश्यक कागदपत्रं जोडा आणि एलपीजी डिस्ट्रीब्यूटर ऑफिसमध्ये जमा करा, जेणेकरून तुमचा आधार नंबर एलपीजी ग्राहक क्रमांक किंवा आयडीशी लिंक होईल. तुमच्या माहितीचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं आधार गॅस कनेक्शनशी लिंक केलं जाईल.

आधार-LPG लिंक करण्याची ऑफलाइन पद्धत

  • स्टेप १: तुमच्या जवळच्या एलपीजी डिस्ट्रीब्यूटर ऑफिसला भेट द्या आणि तिथून फॉर्म १ आणि फॉर्म २ मिळवा.
  • स्टेप २: फॉर्म १ भरून आधार कार्डच्या प्रतीसह बँकेत किंवा डिस्ट्रीब्यूटर ऑफिसमध्ये जमा करा.
  • स्टेप ३: फॉर्म २ भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह एलपीजी डिस्ट्रीब्यूटर ऑफिसमध्ये जमा करा.
पोस्टाद्वारेदेखील करू शकता लिंक
  • स्टेप १: एलपीजी प्रोव्हायडरच्या अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म १ आणि फॉर्म २ डाउनलोड करा.
  • स्टेप २: फॉर्म १ भरून आधार कार्डच्या प्रतीसह तुमच्या बँकेत जमा करा.
  • स्टेप ३: आधार बँक खात्याशी लिंक झाल्यानंतर फॉर्म २ भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह तुमच्या एलपीजी वितरक कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्टानं पाठवून द्या.

Web Title : सब्सिडी पाने के लिए आधार को एलपीजी कनेक्शन से लिंक करें।

Web Summary : एलपीजी सब्सिडी के लिए आधार को लिंक करना अनिवार्य है। ऑनलाइन या ऑफलाइन फॉर्म भरकर एलपीजी प्रदाता को जमा करें। लिंक करने में विफलता के कारण लाभ नहीं मिल पाएंगे। दो फॉर्म जरूरी हैं।

Web Title : Link Aadhaar to LPG connection now to avoid subsidy loss.

Web Summary : Linking Aadhaar to your LPG connection is now mandatory for subsidies. Complete the process online or offline by submitting forms to your LPG provider. Failure to link may result in loss of benefits. Two forms are required.