lokmat Supervote 2024
Lokmat Money >म्युच्युअल फंड > १५ वर्षे पैसे गुंतवल्यास मिळतील १ कोटी, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा; व्याजापोटी कमवाल ७३ लाख

१५ वर्षे पैसे गुंतवल्यास मिळतील १ कोटी, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा; व्याजापोटी कमवाल ७३ लाख

पैसा कमावण्यापेक्षा तो वाढवणं अधिक कठीण काम आहे. पैशांचं मॅनेजमेंट करणं सोपी गोष्ट नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:18 PM2023-08-21T12:18:18+5:302023-08-21T12:18:48+5:30

पैसा कमावण्यापेक्षा तो वाढवणं अधिक कठीण काम आहे. पैशांचं मॅनेजमेंट करणं सोपी गोष्ट नाही.

invest money mutual fund sip 15 years get 1 crore remember 15 15 15 formula 73 lakhs earned as interest details money | १५ वर्षे पैसे गुंतवल्यास मिळतील १ कोटी, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा; व्याजापोटी कमवाल ७३ लाख

१५ वर्षे पैसे गुंतवल्यास मिळतील १ कोटी, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा; व्याजापोटी कमवाल ७३ लाख

How to become Crorepati : पैसा कमावण्यापेक्षा तो वाढवणं अधिक कठीण काम आहे. पैशांचं मॅनेजमेंट करणं सोपी गोष्ट नाही. परंतु सुरुवात कुठून करावी हा प्रश्न सर्वांसमोर असतो. अशात १५*१५*१५ चा नियम अतिशय कामी येतो. हा पैसा वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. हा नियम तुमच्या पैशाला तीन भागांमध्ये विभागतो. गुंतवणूक, कालावधी आणि व्याज. याचाच अर्थ १५ वर्षांसाछी १५ वर्षांसाठी १५ टक्के व्याज. तुम्ही हा फॉर्म्युला वापरला तर तुम्ही नक्कीच कोट्यधीश (How to become crorepati) बनू शकता. याच्या मागे कामी येतो तो म्हणजे कम्पाऊंडिंगचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तेव्हाच कामी येतो जेव्हा तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करता. 

पॉवर ऑफ कम्पाऊंडिंग
मूळ गुंतवणूकीवर व्याज
दोन्ही रकमेवर पुन्हा व्याजाचा फायदा
गुंतवणूक+व्याज+व्याज+व्याज=कम्पाऊंडिंग

१५*१५*१५ चा फॉर्म्युला वापरा
गुंतवणूक - १५००० रुपये
कालावधी - १५ वर्षे
व्याज - १५ टक्के
फंड - १५ वर्षांनंतर १ कोटी रुपये
एकूण गुंतवणूक - २७ लाख
कम्पाऊंडिंग - ७३ लाख रुपये व्याजातून कमाई

२० वर्षांपर्यंत गुंतवणूक
जर तुम्ही म्युच्युअल फंडासोबत एसआयपी केली, तर त्याची सुरुवात १० हजार रुपयांपासून करा. सामान्यपणे यात १२ टक्के रिटर्न मिळतात. या ठिकाणी तुम्हाला २० वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. २० वर्षांत तुमची गुंतवणूक २४ लाख रुपये होईल. परंतु यावर जे व्याज मिळेल ते ७४.९३ लाख रुपये असेल. याचाच अर्थ या ठिकाणी पॉवर ऑफ कम्पाऊंडिंगनं काम केलं. एसआयपीचं एकूण मूल्य ९८.९३ लाख रुपयांवर पोहोचेल. तुम्हाला यावर एकूण ७४.९३ लाख रुपयांचं व्याज मिळेल.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

Web Title: invest money mutual fund sip 15 years get 1 crore remember 15 15 15 formula 73 lakhs earned as interest details money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.