lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुडन्यूज ! आता पोस्टातूनही मिळणार स्वस्त गृहकर्ज

गुडन्यूज ! आता पोस्टातूनही मिळणार स्वस्त गृहकर्ज

सूत्रांनी सांगितले की, आयपीपीबीच्या देशभरात ६५० शाखा असून, १,३६,००० बँकिंग पोहोच केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून आयपीपीबी वेतनधारी नोकरदारांना ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 05:56 PM2021-09-10T17:56:22+5:302021-09-10T17:57:17+5:30

सूत्रांनी सांगितले की, आयपीपीबीच्या देशभरात ६५० शाखा असून, १,३६,००० बँकिंग पोहोच केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून आयपीपीबी वेतनधारी नोकरदारांना ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकेल

Good news! Now you can also get cheap home loans through post | गुडन्यूज ! आता पोस्टातूनही मिळणार स्वस्त गृहकर्ज

गुडन्यूज ! आता पोस्टातूनही मिळणार स्वस्त गृहकर्ज

Highlightsसूत्रांनी सांगितले की, आयपीपीबीच्या देशभरात ६५० शाखा असून, १,३६,००० बँकिंग पोहोच केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून आयपीपीबी वेतनधारी नोकरदारांना ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकेल

नवी दिल्ली : गृहकर्ज घेण्यासाठी आता तुम्हाला बँकेत जाण्याची गरज राहणार नाही. जवळच्या पोस्ट ऑफिसातूनही तुम्ही स्वस्त गृहकर्ज घेऊ शकाल. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीपीबी) एलआयसी हाऊसिंग फायनान्ससोबत (एलआयसी एचएफएल) भागिदारी केली असून, आयपीपीबीच्या ४.५ कोटी ग्राहकांना यामुळे एलआयसी-एचएफएलच्या गृहकर्जाची सुविधा उपलब्ध होईल.

सूत्रांनी सांगितले की, आयपीपीबीच्या देशभरात ६५० शाखा असून, १,३६,००० बँकिंग पोहोच केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून आयपीपीबी वेतनधारी नोकरदारांना ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकेल. या कर्जाचा प्रारंभिक व्याजदर अवघा ६.६६ टक्के असेल. या निवेदनात म्हटले आहे की, ज्या भागात बँकिंग सुविधा पोहोचलेल्या नाहीत अथवा अल्प प्रमाणात पोहोचलेल्या आहेत, अशा भागात स्वस्त गृहकर्जाची  सुविधा या भागिदारीच्या माध्यमातून आयपीपीबी पोहोचवणार आहे. विमा कंपन्यांसोबत काम करण्याची आयपीपीबीची ही काही पहिलीच वेळ नाही. 

 दोन लाख कर्मचाऱ्यांचे मोठे नेटवर्क
दोन्ही कंपन्यांनी एक निवेदन जारी करून या भागिदारीची माहिती दिली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आयपीपीबीकडे २ लाख डाक कर्मचाऱ्यांचे मोठे नेटवर्क आहे. ग्रामीण भागातही हे नेटवर्क काम करते. हेच कर्मचारी गृहकर्जाच्या वितरणात महत्त्वाची भूमिका निभावतील.

Web Title: Good news! Now you can also get cheap home loans through post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.